लांझेंडा येथे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे हस्ते भव्य टेनिस बॉल अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे वितरण आमदार महोदय यांनी केले विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन
*जय माता दी क्रिकेट क्लब यांच्या सौजन्याने आयोजित अंडर टेनिस बॉल अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रमाने समारोप*
*दिनांक ३१/१२/२०२२ गडचिरोली*
*जय माता दी क्रिकेट क्लब लांझेंडा यांच्या सौजन्याने आयोजित भव्य टेनिस बॉल अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गडचिरोली नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिलभाऊ कुनघाडकर, भाजपा युवा मोर्चाचे शहराचे महामंत्री हर्षलभाऊ गेडाम, भाजपा जेष्ठ कार्यकर्ते बालाजी भांडेकर यांचे सह मंडळाचे अध्यक्ष जितू भाऊ चलाख, उपाध्यक्ष गणेश भाऊ नैताम, सचिव गणेश भांडेकर ,दत्तू कापकर, वेदांत सोनटक्के यांचे सह क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते*
*या क्रिकेट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक माता मंदिर क्रिकेट क्लब लांझेंडा तर द्वितीय पारितोषिक जय मातादी क्रिकेट क्लब लांझेंडा या क्रिकेट टीमला मिळाले विजेत्या स्पर्धकांना आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या हस्ते पारितोषिक चषक देण्यात आले. यावेळी आमदार महोदयांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. याप्रसंगी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचे क्रिकेट मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले*