प्रधानमंत्री कौशल्य विकास PMKVY 3.0 योजनेचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा शुभहस्ते उदघाटन

102

प्रधानमंत्री कौशल्य विकास PMKVY 3.0 योजनेचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा शुभहस्ते उदघाटन

गडचिरोली (जिमाका) दि.25 :-  मा. पंतप्रधान यांच्या संकल्पनेतुन PMKVY 3.0 या योजनेचा शुभारंभ दिनांक 26 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या प्रमुख उपस्थितीत उदघाटन होणार आहे. या योजनेअंतर्गत 328 उमेदवारांना विविध कोर्सेमध्ये प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहे. सदर प्रशिक्षण विनामुल्य आहे तसेच या योजनेअंतर्गत कुरखेडा व धानोरा येथे सुध्दा 26 जानेवारी 2021 पासून प्रशिक्षण सुरु होणार आहे. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रविण खंडारे यांनी केले आहे.