गडचिरोली येथील राष्ट्रीय महामार्गावर रस्त्यावर सुरू असलेल्या कामाविषयी कार्यकारी अभियंता अधिकारी यांना दिले निर्देश..खासदार अशोक नेते
_________________________
दिं ०७ जानेवारी २०२३
गडचिरोली:- गडचिरोली येथील राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे बांधकाम चालू आहे. जनतेच्या मागणीप्रमाणे चामोर्शी रोडवरील पोस्ट ऑफिस सिंचाई कार्यालयाजवळ दुभाजकाला क्रॉसिंग रोड देऊन कॅम्प एरियातील जनतेच्या वाहतुकीची अडचण दुर होईल.
तसेच..
१)शिवणी नदिच्या पुलावरील दोन्ही बाजुला पडलेल्या अपघात प्रवण खाचांमध्ये तातडीने काँक्रीट भरून दुरुस्ती करावी.
२) नवेगांव रैतवारी,सुभाषनगर येथिल कृषि उत्पन बाजार समितीचे चेक नाका गावाबाहेर लावावे.
३) अडयाळ चितरंजनपुर व येनापुर,४.६०० कि.मि.महामार्गाला दोन्ही बाजूने ड्रेन मंजूर करून,निर्माण कार्य लवकरात लवकर सुरु करावे.
४)अडयाळ जवळच्या अपघात प्रवण रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी. वरील सर्व सुचनांची राष्ट्रीय महामार्गाचे नागपुर विभागीय कार्यकारी अभियंता श्री.मिश्रा साहेब यांनी तांत्रिक सल्लागार तथा अभियंता यांना तातडीने दखल घेऊन अंमलबजावणी करण्याच्या सूचना खासदार अशोक नेते यांनी दिल्या.