महिलांनी हसत-खेळत जीवन जगण्याचा प्रयत्न करावा    माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांचे प्रतिपादन

58

महिलांनी हसत-खेळत जीवन जगण्याचा प्रयत्न करावा

माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांचे प्रतिपादन

 

*लोकमत सखी मंच गडचिरोली च्या वतीने होम मिनिस्टर कार्यक्रम*

गडचिरोली :- 7 जाने 2023

 

*महिलांना कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असतांना आपल्या कलागुणांना वाव द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही घरातील दैनंदिन कामे करीत असतांना स्वतःकडे त्या लक्ष देऊ शकत नाही लोकमत सखी मंच ने महिलांच्या कलागुणांना समोर आणण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिला असुन त्या माध्यमातून महिला पुढे येऊन आपल्या कलांना विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहेत लोकमत सखी मंचचे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू केलेले हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे . महिलांनी आपल्या नियमित, दैनंदिन कामातून वेळ काढून आपल्या मधील सुप्त गुण बाहेर काढून विविध कला व सांस्कृतिक व बौद्धिक स्पर्धा मध्ये भाग घ्यावा व चांगले हसत खेळत जीवन जगण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी केले.*

लोकमत सखी मंचच्या वतीने आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या

*लोकमत सखी मंच गडचिरोली च्या वतीने महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन आज दि 7 जानेवारी 2023 रोजी गडचिरोली शहरातील पंचवटी नगरातील शिव मंदिरासमोर करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते करण्यात आले.*

*प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत सखी मंचच्या जिल्हा संयोजिका रश्मी आखाडे, सह संयोजिका भाग्यश्री गड्डमवार, भाजप महिला आघाडी च्या शहर अध्यक्ष कविता उरकुडे, शहर महामंत्री रश्मी बाणमारे, पिंकी बैस, मंगला बारापात्रे, मृणाल मुरकुटे, रोहिणी मेश्राम वैशाली केवटकर, वंदना दरेकर,शिवांनी उरकुडे वैशाली मुनघाटे, रूपा दुलमवार, अस्मिता चौधरी सास्ती बघेल, सरिता चौधरी सपना दंडिकवार, ज्योती खरवडे, प्रिया काथवटे उपस्थित होत्या.*

 

*होम मिनिस्टर कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धांमध्ये विजयी महिलांना माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉक्टर गणेश जैन तसेच सखी मंचच्या जिल्हा संयोजिका रश्मी आखाडे सहसंयोजिका भाग्यश्री गड्डमवार यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला . कार्यक्रमात लोकमत सखी मंच सदस्य व पंचवटी नगरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.*