दुचाकीच्या धडकेत विद्यार्थिनी जागीच ठार तर सहा वर्षीय मुलगा जखमी
एटापल्ली जिवनगठा मार्गावरील घटना
एटापल्ली -येथून जवळच असलेल्या जिवनगठा मार्गावर सीआरपीएफ कॅम्प जवळ पैका मासा गुंडरू वय 38 याच्या भरगाव वेगाने असणाऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत कालेज संपल्यानंतर घरी पायी जातांना राजमाता राजकुवरबाई कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली 11व्या वर्गात शिकणारी विध्यार्थीनी सानिया संजय डोंगरे वय 19 रा.जिवनगठा ही विद्यार्थिनी जागीच ठार झाली.तर दुचाकीवर असलेला 6 वर्षीय मुलगा शिव पेका गुंडरू जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच एटापल्ली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. ग्रामिण रुग्णालयात 200 नागरिक जमा झाले होते.परंतु कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.
झालेल्या घटनेबाबत परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे.







