Home गडचिरोली मूलचेरा तालुक्यातील हेटळकसा येथील कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा...

मूलचेरा तालुक्यातील हेटळकसा येथील कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

97

मूलचेरा तालुक्यातील हेटळकसा येथील कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन

 

 

*जयसेवा क्रिडा मंडळाकडून कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे आयोजन*

 

*मूलचेरा*….तालुक्यातील हेटळकसा येथे जयसेवा क्रीडा मंडळाकडून आयोजित ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही सामन्याचे उदघाटन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.

 

या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून आविसचे सल्लागार तथा माजी जि.प.सदस्य कारूजी रापंजी तर प्रमुख पाहुणे म्हणून देवदाचे सरपंच केसरी पाटील तेलामी,माजी जि.प.सदस्य संजयभाऊ चरडुके,उपसरपंच संतोष कुडयेटी,बोल्लेपल्लीचे सरपंच गणेश हलामी,मूलचेरा येथील नगरसेविका सुनिताताई कुसनाके, नगरसेवक बंडुजी आलाम,माजी प.स सदस्य वनिताताई तिम्मा,आविस सल्लागार कुडमेथे ताई,हेटळकसाचे पोलीस पाटील लालसू नरोटे,देवदाचे पोलीस पाटील माणिक उसेंडी,देवदा उपसरपंच संतोष तुमरेटी, रमेश वेलादी,अंबादास वैरागडे,धर्माजी हलामी,सोनूजी झोरे,पल्लो सर चैतु तिम्मा,मनोहर हलामी,माजी सरपंच विजय कुसनाके,जुलेख शेखसह आविसचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी माजी आमदार दिपक दादा आत्राम यांनी कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही मैदानी खेळाविषयी उपस्थित खेडाळुंना बहुमूल्य मार्गदर्शन केले.

 

या दोन्ही सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपक दादा आत्राम व माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडलवार यांच्याकडून तर दोन्ही सामन्यासाठी द्वितीय पुरस्कार देवदा व बोलेपल्ली या ग्रामपंचायतीं कडून ठेवण्यात आले.

 

जयसेवा क्रीडा मंडळाकडून आयोजित कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संदीप मट्टामी यांनी मानले.या उदघाटनीय सोहळ्याला हेटळकसा,बोलेपल्ली व देवदा येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Don`t copy text!