तासिका मानधन शिक्षकांचा 20 जानेवारी पासून बेमुदत खडू-फडा ,परीक्षा शालेय कामकाज बंद आंदोलन
गडचिरोली- तासिका मानधन शिक्षकांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी जिल्हा परिषद गडचिरोली येथे मुख्य कार्यपालन अधिकारी व शिक्षनाधिकारी यांचेकडे एक महिन्यापूर्वी प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन देऊन विचारणा करण्यात आली तेव्हा येत्या 15 जानेवारी पर्यंत तुमच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील असे सांगण्यात आले.परंतु एक महिन्याच्या कालावधी उलटून गेला तरी अजूनपर्यंत त्याची पुर्तता करण्यात आलेली नाही.त्यामुळे तासिका मानधन शिक्षकांवर उपासमारीची पाळी आलेली आहे.
तासिका मानधन शिक्षकाना 20000रुपये एकत्रित मानधन लागू होत नाही तोपर्यंत चालू सत्राचे मानधन तासिके प्रमाणे देण्यात यावे, कायमस्वरूपी शिक्षकांना अतिदुर्गम भागात काम करीत असताना अतिरिक्त वाढीव पगार दिला जातो.आम्ही सुद्धा त्यांच्यासारखेच पूर्णवेळ काम करीत आहोत तर आम्हाला वाढीव पगार तर नाही परंतु तासिकेप्रमाणे मानधन मिळाले पाहिजे, 2021-22 चे मानधन तासिकेप्रमाणे करून उर्वरित मानधनासोबत त्वरित देण्यात यावे,सत्र 2022-23 चे माहे डिसेंबर पर्यंतचे मानधन त्वरीत अदा करून उर्वरित मानधनाची तजवीज करावी.जर आमच्या संपुर्ण मागण्या पूर्ण न झाल्यास 20 जानेवारी पासून बेमुदत खडू-फडा व परीक्षा शालेय कामकाज बंद आंदोलन करण्याचा इशारा तासिका मानधन शिक्षकानी दिला आहे.







