Home गडचिरोली महेश मनमत सिकदर या विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यूने परिवारावर शोककळा

महेश मनमत सिकदर या विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यूने परिवारावर शोककळा

103

महेश मनमत सिकदर या विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यूने परिवारावर शोककळा

एटापल्ली- येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाचा 11वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी महेश वय 17 याच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

महेश हा शुंभकर नणंदलाल सरकार वय 23 या मित्रासोबत दुचाकीने 13 जानेवारीला चामोर्शी तालुक्यातील गुंडापल्ली येथे रात्रकालीन बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेला होता.तो सामने खेळून रात्री एक वाजताच्या दरम्यान परत येत असताना शुंभकर सरकार चालवत असलेली गाडी चामोर्शी तालुक्यातील रेगडी गावाजवळ घसरून पडली. झालेल्या अपघातात शुंभनकर सरकार किरकोळ जखमी झाला. तर महेश सिकदर च्या डोक्याला जबर मार लागून अत्यवस्थ झाला. अपघातानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.त्यानंतर त्याला चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. गेल्या चार दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते.त्याच्या डोक्याची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.परंतु तो उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने अखेर त उपचारादरम्यान 19 जानेवारीला त्याची प्राणज्योत मावळली.महेश हा आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Don`t copy text!