शिक्षक मतदार व कार्यकर्ता मेळावा या मेळाव्याला भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

59

शिक्षक मतदार व कार्यकर्ता मेळावा या मेळाव्याला भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

 

खासदार तथा जिल्हा निवडणुक प्रमुख अशोकजी नेते यांनी या मेळाव्याला जिल्ह्यातील शिक्षक मतदार बंधू आणि भगिनींनी जास्तीत जास्त संख्येनी आवर्जून उपस्थित रहावे असे आव्हान केले आहे

गडचिरोली:- उद्या दिं.२५जानेवारी २०२३ ला सकाळी:- ११.०० वाजता. फंक्शन सेलिब्रेशन हॉल चामोर्शी रोड, गडचिरोली येथे शिक्षक मतदार व कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेला आहे.* *नागपुर विभागीय शिक्षक मतदार संघाचे भाजपा,शिवसेना (शिंदे गट) आरपीआय युतीचे समर्थित उमेदवार नागो पुंडलिक गाणार यांच्या प्रचारार्थ शिक्षक मतदार व कार्यकर्ता मेळाव्याला भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे या शिक्षक मतदार मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.तरी या मेळाव्याला जिल्ह्यातील शिक्षक मतदार बंधू आणि भगिनींनी तसेच भाजपाच्या सर्व आघाडीसह, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त संख्येने आवर्जून उपस्थित राहावे असे आव्हान खासदार तथा जिल्हा निवडणूक प्रमुख,व राष्ट्रीय महामंत्री अनुसूचित जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी केलेले आहे तसेच संतोष सुरावार सर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोली यांनी सुद्धा या मेळाव्याला शिक्षक मतदार बंधू आणि भगिनींना,शिक्षक सेल,म.रा.शिक्षक परिषद,शिक्षण मंच,भाजपा शिक्षक आघाडी च्यां कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहावे असे आव्हान केले आहे.