मुलांनो मोबाईलचा अतिवापर टाळा डोळे निकामी होतील नेत्रतज्ञ डॉ.रमेश कलकोटवार यांचे आवाहन
आष्टी:
दिवसेंदिवस तरुण पिढीमध्ये मोबाईलचा अतिवापर वाढतो आहे .घरोघरी मोबाईल असल्यामुळे मुलांच्या हातात मोबाईल पोहोचतो आणि त्या मोबाईलकडे मुले सातत्याने पाहिल्यामुळे डोळ्यावर त्याचा विघातक परिणाम होतो.सतत मोबाईलकडे पहिल्यामुळे डोळ्यातील पाण्याची पातळी कमी होऊन शुष्कपणा वाढतो. डोळे लाल होणे, डोळ्यात आग होणे, खाजणे यासारख्या आजाराच्या प्रादुर्भावाने चष्मा लागतो. म्हणून डोळ्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यकता आहे त्यासाठी दररोज सकाळी उठल्यावर डोळे फिरविण्याचा मसल व्यायाम करणे गरजेचे आहे. मुलांनो मोबाईलचा अतिवापर टाळावा आणि डोळे सदृढ ठेवावेत असे आवाहन डॉ.रमेश कलकोटवार यांनी केले. ते महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी येथील राष्ट्रीय सेवा योजने विभागाच्या वतीने चपराळा येथे आयोजित विशेष श्रम संस्कार शिबिरात नेत्रतपासणी कार्यक्रमात बोलत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझले, उपसरपंच दयानाथ कोकेरवार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.राजकुमार मुसने ,सह कार्यक्रमाधिकारी प्रा. ज्योती बोबाटे तथा शिबिरार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते नेत्रतज्ञ डॉ. रमेश कलकोटवार यांनी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिबिरार्थी व ग्रामस्थांची नेत्र तपासणी करुन उपचार केले. उपस्थितताना नेत्रदान करण्याविषयी आवहान करुन जनजागृती करण्यात आली.