: प्रजासत्ताक दिनी आम आदमी पक्षाच्या वतीने ध्वजारोहण मोहीम.
आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सहाप्रभारी मा. गोपाल भाई इटालिया, राज्य संयोजक मा. रंगा राचूरे आणि राज्य समिती यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आज देशाच्या ७४ व्या “गणराज्य दिनी” गुरुवार दिनांक २६ जानेवारी, २०२३ रोजी जिल्हा गडचिरोली आम आदमी पक्षाच्या वतीने ___गडचिरोली_______ या जिल्ह्यात आम आदमी पार्टी_जन संपर्क कार्यालय कॅम्प एरिया______ या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आप चे जिल्हा संयोजक मा बाळकृष्ण सावसाकडे यांचे अध्यक्षतेखाली मा. ऍड संजय ठाकरे ________ यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव भास्कर इंगळे,संघटनमंत्री डॉ देवेंद्र मुनघाटे, कोषाध्यक्ष संजय जीवतोडे ,जिल्हा महिला संयोजक मीनाताई खरवडे, महिला संघटनमंत्री अल्का गजबे, _युवा महिला सहसंयोजक सोनल ननावरे,शहर महिला संयोजक समीता गेडाम, सहसंयोजक रुपेश सावसाकडे, युवा संयोजक नामदेव पोले_______ जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, , तरुण तरुणी, प्रतिष्ठित नागरिक तसेच आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व पक्षाचे हेमराज हस्ते,गणेश त्रिमुखे, संतोष कोटकर, शत्रूघन ननावरे, दिवाकर साखरे,सावंत सावसाकडे, प्रभाकर वाकडे,प्रीती लेनगुरे,शिल्पा पेटकर, प्रशिका पेटकर,संगीता बडके, शीतल पवार,किरण राठोड, शोभा बावनवाडे, शिला खांडेकर, गीता बांबोळे, वर्षा मेश्राम, सुजाता मांडवे,अल्का खेरकर सुकेशनि रामटेके,शेशिकला कुलेटी , चोखाजी ढवळे_आदी शहरातील________ कार्यकर्ते मोठ्या संख्येने संपूर्ण शिस्तपालन करत ध्वजारोहण कार्यक्र मात सहभागी झाले होते.
यावेळेस भारताच्या संविधानाची “प्रास्ताविका” (preamble) चे जाहीर वाचन करण्यात आले. हा देश सर्व थोर पुरुष व घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे च चालला पाहिजे, संविधानातील मूल्ये आपण सर्वांनी अंगिकारली पाहिजे तसेच समाजातील सर्व जात, भाषा, धर्म व पंथाच्या लोकांनी एकत्र येऊन संविधानाचे रक्षण केले पाहिजे अशी भावना प्रमुख पाहुणे तसेच अनेक प्रतिष्ठित पाहुण्यांनी केली. जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते तसेच जिल्हा समितीचे सर्व पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडत मोठ्या उत्साहाने साजरा केला. यावेळेस विविध देशभक्ती गीत,महिला करिता हळदी कुंकू ( वाणाचा ) कार्यक्रम चे आयोजन देखील करण्यात आले होते.