खासदार अशोक नेते यांची गडचिरोली येथील एमआयडीसी च्या आईस्क्रीम फॅक्टरी ला भेट.
———————————————–
*या निमित्याने गुरुकुंज मोझरी येथील कीर्तनकार ह.भ.प.काळे महाराज यांची याप्रसंगी सदिच्छा भेट*
———————————————
दि.२६ जानेवारी २०२३
गडचिरोली:-आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने कोटगल च्या एमआयडीसी येथील आईस्क्रीम फॅक्टरी ला खासदार अशोकजी नेते यांनी भेट दिली असता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचारांचे असे प्रवचन करणारे गुरुकुंज मोझरी येथील कीर्तनकार ह.भ.प.काळे महाराज यांनी आपले विचार व्यक्त करत,आपल्या प्रवचनातून लोकांना मंत्रमुग्ध केले.
यावेळी खासदार अशोकजी नेते यांनी आपले विचार व्यक्त करतांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेले कार्य अमूल्य व जगाला मानवतावादी संदेश देणारे आहे.त्यामुळे त्यांच्या आचार विचारांची आज खऱ्या अर्थाने जगाला गरज आहे.असे यावेळी प्रतिपादन केले,
तसेच याप्रसंगी खासदार अशोकजी नेते व ह.भ.प.काळे महाराज यांचे आईस्क्रीम फॅक्टरी चे मालक अमोल चकनलवार तसेच परिवारांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी अमोल चकनलवार,रामभाऊ चकनलवार,निलेश, सचिन व चकनलवार परिवार तसेच फॅक्टरीतील कर्मचारी,जनता उपस्थित होते.