धान खरेदी केंद्रावरील धान खरेदीची मर्यादा वाढवा आमदार डॉ देवरावजी होळी यांना शेतकऱ्यांचे निवेदन

54

धान खरेदी केंद्रावरील धान खरेदीची मर्यादा वाढवा आमदार डॉ देवरावजी होळी यांना शेतकऱ्यांचे निवेदन

 

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची दुधमाळा धान खरेदी केंद्राला भेट*

 

*केंद्रामध्ये धान खरेदी करू देण्यास परवानगी देण्याची केलेली विनंती*

 

*दिनांक ३०/१/२०२३ गडचिरोली*

 

*धानोरा तालुक्यातील दूधमाळा धान खरेदी केंद्रावर मेंढा (लेखा) येथील शेतकऱ्यांनी ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करून सुद्धा अजून पर्यंत धान खरेदी करण्यात आलेली नसल्याने चिंतेत पडले असून धान खरेदीची मुदत व धान खरेदीची मर्यादा दोन्ही वाढवण्यात यावी व आमचे धान केंद्रांवर घेण्यात यावे अशी विनंती करणारे निवेदन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना दूधमाळा येथील धान खरेदी संकलन केंद्रावर निवेदनाच्या माध्यमातून केली*

 

*यावेळी भारतीय जनता पार्टी धानोरा तालुक्याचे अध्यक्ष शशिकांतजी साळवे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य लताताई पुंघाटी, लेखा मेंढा येथील शिवरामजी दुग्गा, मनिराम करंगामी, प्रभुदास तोफा, दामाजी दरो, देवराव दुग्गा , अलीराम हिचामी, सोमजी कुडो, रामदास तोफा यांचे सह शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्थित होते*

 

*मागील वर्षी याच धान खरेदी केंद्रावर खरेदी प्रक्रिया योग्यपणे पार पडली होती. परंतु यावर्षी त्यात अडचणी येत असल्याचे शेतकऱ्यांनी आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांच्या निदर्शनास आणून दिले. लवकरात लवकर धान खरेदी न झाल्यास व त्याचे पैसे आम्हाला न मिळाल्यास मोठे आर्थिक संकट येणार असल्याने आम्हाला तातडीने मदत मिळवून द्यावी अशी विनंती त्यांनी यावेळी केली.*