जिल्हा परिषद शाळाजाजावंडी शाळेत सजली बाल आनंद मेळावा व शैक्षणिक वार्षिक स्नेहसंमेलन
एटापल्ली:- तालुका मख्यालयापासून 40 कि. मी. अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जाजावंडी या अतिदुर्गम, नक्षलग्रत, भागातील या अरण्य शाळेत दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण बाल आनंद मेळावा व शैक्षणिक वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.ही कार्यक्रम जाजावंडी गावातील शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामसभा जाजावंडी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.या अरण्य शाळेतील बाल आनंद मेळावा व शैक्षणिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून श्री.सैनुजी गोटा माजी सदस्य जिल्हा परिषद गडचिरोली, अध्यक्ष म्हणून कु.पूनम लेकामी सरपंचा ग्रामपंचायत गट्टा,उपाध्यक्ष सौ.शिलताई गोटा माजी सदस्या पंचायत समिती एटापल्ली,श्री.लक्ष्मण नवडी सचिव सुरजागड इलाका,श्री,लालू लेकामी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती जाजावंडी, श्री.शामराव तुमरेटी अध्यक्ष ग्रामसभा जाजावंडी हे होते.
बाल आनंद मेळावा व शैक्षणिक वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी व गावातील पालकांसाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने
शैक्षणिक एकांकिका,शैक्षणिक जागृतीपर नाटक,स्किट्स,अस्सल मराठी लावणी,आदिवासी पारंपरिक नृत्य,रसमधुर कथा,सुमधुर कविता गायन,शैक्षणिक नक्कल,विद्यार्थी वैयक्तिक व सांघिक खेळ,पालक वैयक्तिक व सांघिक खेळ,रस्सी खेच,संगीत खुर्ची,चम्मच गोळी वरील सर्व खेळ व कार्यक्रमात विद्यार्थी व पालक उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
दरवर्षी अशाप्रकारचे विविध नवोपक्रम या अरण्य शाळेत घेत आल्याने या शाळेची पटसंख्या 8 वरून 123 पर्यंत पोहोचली. या भागातील आजूबाजूला असलेल्या गावातील विद्यार्थी सुद्धा या अरण्य शाळेत शिक्षण घेण्यासाठी ओढ लागली आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असलेले विद्यार्थी सुद्धा या शाळेत प्रवेश घेत आहेत.
ही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.एम.सी.बेडके,शाळेतील शिक्षक श्री.दिवटे,श्री.बोरकर,श्री.नागापुरे व स्वयंसेवक श्री. सुरेश मेश्राम यांनी परिश्रम घेतले.







