शहरातील श्रीराम मंदिराच्या सौंदर्यकरणासाठी २० लक्ष रूपयांचा निधी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा श्रीराममंदिर समितीच्या वतीने सत्कार
*दिनांक: ५ फेब्रूवारी गडचिरोली*
*गडचिरोली शहरातील श्रीराम मंदिराच्या सौंदर्य करण्यासाठी व विकास कामासाठी २० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झालेला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे मंदिराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीराम मंदिर समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष माननीय सुरेश सावकार पोरेडीवार, विश्वस्त श्री अरुण भाऊ निंबाळकर व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.*
*यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री रविंद्रजी ओलालवार , माजी सभापती मारोतराव इचोडकर , माजी उपसभापती विलासजी दशमुखे, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे , सोनटक्के महाराज, रविजी भोयर , राहुल पाटिल , महेश टेकाम, रमेश टेकाम , तथा मंदिर समिति सदस्य उपस्थित होते.*
*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली शहरातील विविध मंदिराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानिमित्त मंदिरांना भेटी देत प्रत्येक मंदिराच्या विश्वस्तांशी चर्चा करीत आहेत. शहरातील मंदिरांचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करत असून त्यात कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी विश्वस्तांना दिला.*







