अंशतः अनुदानित शाळाना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजुरी नुसार अनुदान आदेश द्या
संतोष सुरावार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परीषद गडचिरोली यांचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन
गडचिरोली- महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक मा शा अ-2022/प्र. क्र.275/एस एम-4 दिनांक 6 फेब्रुवारी 2023 संदर्भानुसार शासनाने कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या शाळा , यापूर्वी अंशताअनुदान घेत असलेल्या खाजगी प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालये/वर्ग तुकड्यांना व अनुदानास पात्र असलेल्या शाळांना वाढीव टप्पा अनुदान मंजूर केलेला असून त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील शाळांमधील कर्मचारी वेतन आणि लाभापासून वंचीत होते आणि सध्या शासनाने मंजूर केलेला जो निधी आहे तो संबंधिताच्या खात्यात 31 मार्च 2023 पूर्वी जमा होण्यासाठी आपल्याकडून सर्व संबधित शाळांना आदेश द्या अशी आग्रही मागणी संतोष सुरावार जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद गडचिरोली यांनी शिक्षणाधिकारी यांचेकडे केली.