एटापल्ली तालुका विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे वतीने तहसीलदार मार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

76

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम नक्सालग्रस्त आदिवासी बहुल अविकसित तालुका म्हणून ओळखले जाणारे एटापल्ली तालुका विकासाचा मुख्य प्रवाहात आणण्याकरीत मोहन नामेवार भारतीय जनता पक्ष एटापल्ली यांच्या तर्फे तहसीलदार मार्फत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेविदन करण्यात आले आहे.

निवेदतून,तालुक्याचा मुख्य ठिकाणी फक्त एकच बी.एस.एन.एल कंपनीचा नेटवर्क असतो.नागरीकांना आपल्या ऑनलाईन कामाकरीत शेकडो दुरून रस्ताअभावी नाल्यातून,पाऊलवाट धरून तालुकास्थाळी यावे लागते,तालुक्यातील अनेक क्षेत्र नेटवर्क पासून दूर आहे अशा परिस्थितीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते,करिता तालुक्यात प्रत्येक ठिकाणी बी.एस.एन.एल सह खाजगी कंपनीचा नेटवर्क उपलब्ध करून द्यावी.तालुक्यातील वन दावे प्रलंबित असून लवकरात लवकर मार्गी लावावे,चोखेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले रस्ते-नालीच्या समस्याचा तोडगा कडून समाधान करावे,तालुक्यातील स्वस्त धान्य दुकान स्थानीक गावातील महिला बचत गटांना देण्यात यावी,तालुक्यात अनेक ठिकाणी आरोग्य सेवा नसल्याने ग्रामीण भागातिला लोकांना ६०-७० किमी चा प्रवास करीत ग्रामीण रुग्णालयात यावे लागते रास्त व्यवस्थित नसल्याने व वाहतूक सेवा सुर्डीत नसल्याने अनेक नागरीकांची जिवीत हानी होत आहे करीता तालुक्यातील ग्रामीण भागात एन.एम सेंटर सुरू करण्यात यावी.एटापल्ली येथे लहान मुलांनकरिता गार्डन व खेळन्याकरिता साहित्य उपलब्ध करून द्यावी अश्या अनेक मागण्यासह भाजपा पक्षाने निवेदन दिला आहे.यावेळी मोहन नामेवार भाजपा एटापल्ली,बाबुराव गंपावार,अशोक पुलूरवार,उष्णाजी मेडिवार,राकेश मटामी,अनिल मटामी,रैजू जुरे,शंकर उसेडी,अशोक मडावी,साईनाथ पल्लो,लालसू नारोटे व इतर भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एटापल्ली तालुका अति संवेदनशील असला तरी भाजपा तर्फे कोणत्याना कोणत्या माध्यमातून विकासाकडे जोडण्याकरिता प्रयत्न सुरु आहे.भाजपाची यंत्रणा सज होऊन कामात लागली असून काही नेत्यांनी भाजपात प्रवेश केला असून आता भाजपाची पकड एटापल्ली तालुक्यात मजबूत झाली.आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूकित भाजपाचा झेंडा फडकणार असून त्याकरीता कार्यकर्तेनी कंबर कसली असल्याचे चर्चेत आहे.