सांघिक खेळाचे महत्व अनन्यसाधारण:भाग्यश्री ताई आत्राम कोत्तापल्ली येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामने

87

सांघिक खेळाचे महत्व अनन्यसाधारण:भाग्यश्री ताई आत्राम कोत्तापल्ली येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामने

 

सिरोंचा: सांघिक पद्धतीच्या खेळामध्ये प्रत्येक खेळाडूंचा एकमेकांशी संवाद असतो. त्यामुळे संघ भावनेची वाढ होते. कोणी आपल्या संघासाठी खेळतो त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. सांघिक खेळामुळे एकात्मतेची भावना निर्माण होत असल्याने अशा प्रकारच्या खेळाचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले.ते सिरोंचा तालुक्यातील कोत्तापल्ली येथे फालकन क्रिकेट क्लब तर्फे आयोजित भव्य टेनिस बॉल स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटलक्ष्मी अरवेली, माजी नगरसेवक रवींद्र रालाबंडीवार, संतोष रंगू , रवींद्र कोटापल्ली, रमेश कोंडागुर्ला, रामकृष्ण मारला, नवीन कुमरी, योगेश अनुमुला, रघु कोंडा, सदाशिव सोनारी, महेश मोरला, रामबाबू सोनारी, प्रवीण कावेरी, पवन सोनारी, कल्याण सिप्पीडी,जयराम पागे,सुरेश गोगुला,वेंकटेश जुलगुरी, साई किरण मोरला,सडवली मोरला,सत्यम कोंडा, सत्यम सोनारी, रेवत कोंडा,रवी अणुमुला आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पुढे बोलताना सांघिकपणे खेळताना मदत केली पाहिजे ही भावना देशपातळीवर देखील दिसून येते. एकमेकांशी आपली स्पर्धा असते. मात्र संघ म्हटला की आपण सर्वजण सारखे असतो. संघासाठी आपण एकमेकांना मदत करतो. जीवनात प्रत्येकाने एकमेकांना मदत केली तर प्रत्येक व्यक्ती यशस्वी होऊ शकतो असेही ते म्हणाले आणि टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित संघांना शुभेच्छा दिले.

 

भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तीन आकर्षक पारितोषिक देण्यात येणार आहे. फालकन क्रिकेट क्लब तर्फे या स्पर्धेचे चांगल्या प्रकारे आयोजन करण्यात आले आहे. आठवडा भर चालणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी परिसरातील बहुतांश क्रिकेटच्या चमुंनी सहभाग नोंदविला आहे.