प्रेस नोट
गडचिरोली जिल्हा आम आदमी पार्टी च्या वतीने इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे मा.उप मुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचे अटकेचा निषेध करण्या साठी मोदी सरकार विरोधात निदर्शने
———‐————-
गडचिरोली.दी.27 फेब्रुवारी
काल रात्री दिल्लीचे शिक्षामंत्री व उपमुख्यमंत्री श्री मनिष सिसोदिया यांना दिल्ली येथुन सिबीआय ने फर्जी गुन्हे लावुन बेकायदेशीर अटक केल्यानंतर, देशभरात संतापाची लाट उसळली आहे. आज संपुर्ण देशात आम आदमी पार्टी च्या वतीने केंद्र सरकार मोदी सरकार विरोधात निदर्शने आंदोलने करण्यात आले.
आज गडचिरोली जिल्हा आम आदमी पार्टी तर्फे सुध्दा आप कार्यकर्त्यांनी इंदिरा गांधी चौक गडचिरोली जिल्हा आप प्रमुख बाळकृष्ण सावसाकडे यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सी.बी.आई विरोधात तिव्र निषेध नोंदवला, निदर्शने केली , धरणे आंदोलन करण्यात आले.
तसेच केंद्र सरकारच्या मोदी- शहा सरकारच्या तानाशाही ‘दडपशा ही दबाव् तंत्र विरोधात मोदी शहा सरकार होश मे आवो. मोदी तेरी ताना शाही नही चलेगी,केंद्र सरकारचा धिक्कार असो,मोदी सरकार हाय हाय अशी घोषणाबाजी देण्यात आली.
याप्रसंगी गडचिरोली जिल्हा संयोजक श्री बाळकृष्ण सावसाकडे यांनी घोषणा देत यांनी आपले प्रखर विचार मांडले. याप्रसंगी गडचिरोली जिल्हा सचिव भास्कर इंगळे, कोषाध्यक्ष संजय जीवतोडे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी खरवडे, जिल्हा महिला सचिव सोनल ननावरे, महिला शहर प्रमुख समीता गेडाम, शहर सचिव संतोष कोटकर,शहर प्रमुख नामदेव पोले,संघटनमंत्री हितेंद्र गेडाम प्रीती लेनगुरे,खेमराज हस्ते,दिवाकर साखरे,प्रकाश शेंडे,प्रसाद खरवडे,प्रमोद वाटे ,शैलेश खांडेकर आदी कार्यकर्ते निदर्शनास उपस्थित होते.
कृपया प्रसिद्धीसाठी
दैनिक…
गडचिरोली जिल्हा प्रातिनिधी
बाळकृष्ण सावसाकडे जिल्हा प्रमुख आप गडचिरोली
२७/०२/२३







