*छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात समता बंधुता व संहिष्णुता जोपासण्याचं मोलाचं काम केलं – डॉ. नामदेव किरसान.*
दिनांक 10 मार्च 2023 रोजी मौजा हरदोली ता. ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर येथे तिथीनुसार रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. जयंती उत्सवाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या पिढीला कसे प्रेरणादायक आहेत याचे महत्त्व विशद करतांना सांगितले की, शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याचं स्वप्न बघितलं व ते पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर झटत राहिले. युवकांनी सुद्धा ह्या वयात कोणतेही व्यसनाच्या आहारी न जाता स्वतःचे जीवन घडविण्यासाठी कष्ट करावे. शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्म पंथाच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना करण्याचं स्वप्न बघितलं. त्यांनी स्वराज्यात धर्म जातीपाती पंथाच्या नावावर कुठलाही भेदभाव न करता व अस्पृश्यता झुगारून समतेचे राज्य प्रस्थापित करण्याचं मोलाचं काम केलं. त्यांच्या सैन्यात हिंदू मुस्लिम व अठरापगड जातीचे मावळे होते. त्यांनी उच्च नीच भेदभाव कधीच मानला नाही. त्यांनी अफजलखानाचा वध केल्यानंतर जिजाऊंच्या सांगण्यावरून त्याच्या प्रेताला सन्मानपूर्वक प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन करून कबर बांधली. अशा रीतीने एक आदर्श घडविण्याचे काम त्यांनी केले. या महान थोरांनी व संतांनी घालून दिलेला आदर्श आज सर्वांनी पाळण्याची गरज आहे तरच शिवाजी महाराजांची जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल असे सुतोवाच त्यांनी केले.
याप्रसंगी जयंती सोहळ्याचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद भाऊ चिमूरकर, सह उद्घाटक माजी जि प सदस्य स्मिताताई पारधी, भास्कर भाऊ नाकतोडे, योगिताताई आमले, वडसा तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेंद्रजी बुल्ले, अ.जा. विभाग जिल्हाध्यक्ष गडचिरोली रजनीकांत मोटघरे, जयपालभाऊ पारधी, जगदीशभाऊ आमले, इंद्रजीतभाऊ पिल्लारे, हरीजी शिंगाडे, श्रीरामजी बोराडे, सचिनभाऊ पत्रे, श्रीकांतभाऊ पत्रे, गिरीधरभाऊ पत्रे, किरणताई ढोंगे, देवानंदजी पत्रे, देविदासजी ठाकरे, श्रीकांतजी कोपरे व गणमान्य मंडळी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.







