भारत भ्रमण यात्रा व्दारे ह.भ.प.मोरे महाराज यांची हनुमान मंदिरला भेट
अकलूज जि. सोलापूर येथील 73 वर्षीय ह भ प मोरे महाराज यांची सायकल व्दारे भारत भ्रमण यात्रे दरम्यान कॅम्प एरिया येथील हनूमान मंदिर येथे रात्रीच्या निवासासाठी आले असता हनुमान उत्सव समितीच्या वतीने त्यांचे पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यांच्या भोजनाची व्यवस्था मा. मनोज भाऊ चन्नlवार यांचे घरून करण्याचा आली. त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा व सर्वांनी त्यांना देणगीच्या माध्यमातुन यथाशक्ती मदत करण्यात आली. यावेळी हनुमान उत्सव समितीचे सर्व सहकारी उपस्तिथ होते.