विवाहित महिलेने अभियंता पती व 14 महिन्याच्या चिमुकलीला सोडून धरला प्रियकराचा हात

72

विवाहित महिलेने अभियंता पती व 14 महिन्याच्या चिमुकलीला सोडून धरला प्रियकराचा हात

अकोला जि. प्र.-

एका उच्चशिक्षित विवाहित महिलेने प्रियकरासोबत पळून जाण्यापूर्वी पुण्यातील अभियंता पती,14 महिन्याच्या चिमुकलीचा आणि समाज, नातेवाईक, व कुटुंबातील व्यक्तींचा विचार केलेला नाही.

प्रेमात पडले की, प्रेमीयुगल सर्व काही विसरून जातात. समाज,नातेवाईक, व कटूंबियाचा ,लहान मुलांचा विचार न करता प्रेमात आंधळे होऊन जातात. असाच एक प्रकार अकोला जिलह्यात उघडकीस आल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झालेला आहे. विवाहित महिला मुलीला घेऊन 15 दिवसांपूर्वी पळून गेली. पोलिसांनी पकडून आणल्यावर विवाहित प्रेयसीने प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने दोन्ही कटूंबियाना धक्काच बसला.