*वूमेन्स अचिव्हर्स आयकॉन ऑफ विदर्भ 2023* या पुरस्काराच्या मानकरी गीता हिंगे
जागतिक महिला दिना निमित्य 12 मार्च रोज रविवारला ब्रम्हकुमारी विश्वशांती सरोवर, जामठा येथे वूमेन्स अचिव्हर्स आयकॉन ऑफ विदर्भ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. अतिशय भव्य दिव्य असा हा सोहळा होता. ब्रम्हकुमारी विश्व शांती सरोवर च्या भव्य हॉल मध्ये हजारोच्या संख्येने महिला आणी पुरुष या सोहळ्याला उपस्थित होते. या कार्यक्रमच्या प्रमुख अतिथी रशिया वरून आलेल्या राजयोगिनी ब्रम्हकुमारी चक्रधारी दिदी तसेच डॉ.सविता दिदी , रजनी दिदी, मनीषा दिदी,प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले, सिंघनिया ड्राय फ्रुट व 24 स्टार प्राईड क्लब च्या डायरेक्टर कविता सिंघनिया, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत, शिवकमल साई फिल्म मुंबई च्या फिल्म अभिनेत्री इलाकीर्ती,ज्युनिअर अमिताभ व अन्य मान्यवर उपस्थित होते.या पुरस्कारासाठी विदर्भातील 11 जिल्ह्यातून नामांकन अर्ज आलेले होते.त्यामधून परीक्षण करून विदर्भातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या एकूण 12 महिलांना हा पुरस्कार दिला गेला.यावेळी सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार पहिल्यांदा नागपूरच्या बाहेर गेला आणी तेसुद्धा गडचिरोली सारख्या आदिवासी भागात काम करणाऱ्या महिलेला मिळाला ही खरोखरच अभिमानाची बाब आहे असे या कार्यक्रमाच्या आयोजक डॉ रिचा जैन म्हणाल्या.यापूर्वीही गीता हिंगे यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.परंतु वूमेन्स आयकॉन ऑफ विदर्भ 2023 हा विदर्भाचा मानाचा समजला जाणाऱ्या पुरस्काराच्या मानकरी गडचिरोलीच्या आधारविश्व फाऊंडेशन च्या अध्यक्षा गीता हिंगे ठरल्यामुळे सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या सोहळ्याला आधारविश्व फाऊंडेशन च्या उपाध्यक्षा विना जंबेवार, सचिव सुनीता साळवे, सदस्या विजया मने उपस्थित होत्या.







