*बारसागड येथे मृतक काँग्रेस कार्यकर्त्यांचा कुटूंबियाला आर्थिक मदत*
*सावली*
*दिनांक: १६ मार्च २०२३*
सावली तालुक्यातील बारसागड हे गाव चिखली या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणारे छोटेसे गाव असून येथील डंबाजी सोमाजी सलामे हे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध होते.ते
अनेक दिवसापासून आजारी होते.ते एक चांगले कार्यकर्ता व संघटक होते.काँग्रेस पक्ष भारतीय ग्रामीण जीवनाचा अविभाज्य घटक तर कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असतो.*”डंबाजी सोमाजी सलामे यांच्या मृत्यूमुळे पक्षाचे खूप मोठे नुकसान झाले. एक प्रामाणिक कार्यकर्ता गमवला याचे दुख आहे काँग्रेस पक्ष व मी त्यांच्या पाठीशी आहे माहिती कळतच असे प्रतिपादन माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी केले आहे.*
डंबाजी सोमाजी सलामे हे भूमिहीन शेतमजूर होते.यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी,
एक लहान मुलगी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
प्रत्येक कार्यकर्त्याला मदत करणे, त्यांचा सुुख- दुःखात सहभागी होणे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे धोरण आहे. चिखली गावच्या सरपंच रेखाताई बानबले यांनी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांना या घटनेबद्दल माहिती दिली होती. आज सदर आर्थिक मदत गावचे उपसरपंच युवराज चौधरी यांचे हस्ते डंबाजी सोमाजी सलामे यांच्या पत्नी श्रीमती किरण सलामे व कुटुंबियांना देण्यात आली.
या वेळी उपस्थित तालुकाध्यक्ष नितीन गोहणे,बंडू बोरकुटे माजी तालुकाध्यक्ष, आशिष आखाडे निफंद्रा ,दिलीप लटारे ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष लोंढोली,युवराज चौधरी उपसरपंच चिखली,रामचंद्र निसार पोलीस पाटील बारसागड, टिकाराम सलामे,ढेमदेव चौधरी, रामचंद्र चिमुरकर, दिनकर चौधरी व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.







