युनेस्को स्कूल क्लब ऑफ महाराष्ट्र तर्फे ऑनलाईन राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

172

युनेस्को स्कूल क्लब ऑफ महाराष्ट्र तर्फे ऑनलाईन राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याचा रोहित बंडू मडावी या विद्यार्थ्यांची चित्रकला ठरली देशात अव्वल

युनेस्को स्कूल क्लब ऑफ महाराष्ट्र आणि असोसिएशन ऑफ नवी दिल्ली यांच्या संयुक्त विदयमाने दिनांक ०५ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०२० या कालावधीत ऑनलाईन राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.

“कोविड मुक्त भारत” या विषयावर देशभरातील सर्व नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली होती.सदर स्पर्धा संपूर्ण देशभर असल्याने या स्पर्धेमध्ये राज्यभरातील तसेच इतर राज्यातील अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक रुपये ३५००,प्रमाणपत्र व ट्राफी,द्वितीय क्रमांक २५००,प्रमाणपत्र व ट्राफी आणि तृतीय क्रमांक १५००,प्रमाणपत्र व ट्राफी या प्रमाणे बक्षिस देण्यात येणार होते.सदर स्पर्धेचा निकाल २६ जानेवारी २०२१ रोजी घोषित करण्यात आला.

आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील रोहित बंडू मडावी रा.कसनसुर तालुका एटापल्ली या विद्यार्थ्यांने सदर स्पर्धेत भाग घेऊन देशभरात प्रथम क्रमांक मिळवून गडचिरोली जिल्ह्याचे नाव संपूर्ण देशात लौकिक केले.

कोरोना काळातही चित्रकला काढण्याची संधी उपलब्ध करून दिल्यामुळे रोहितने आपल्या यशाचे श्रेय युनेस्को स्कूल क्लब ऑफ महाराष्ट्र आणि असोसिएशन ऑफ नवी दिल्ली यांना तसेच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना व मित्र परिवाराला दिले आहे.
रोहितच्या या यशामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या आनंद गगनात मावेनासा झाला आहे.