एटापल्ली तालुक्यातील समस्या सोडविण्या बाबत उपमुख्यमंत्री यांना भाजपा एटापल्ली तर्फे निवेदन
(गडचिरोली):एटापल्ली तालुका हा अतिदुर्गम नक्सालग्रस्त भाग म्हणून ओळकल्या जातो,या तालुक्यात बहुतांश विकास झाला नाही,नोकरी व रोजगार बाबतीत हा तालुका वंचित आहे.एटापल्ली तालुक्यातील प्रत्येक गाव विकास पासून दूर कोसो आहे.
स्वतंत्राला ७५ वर्षे पूर्ण झाले तरी अमृत महोत्सव वर्षी पर्यंत सुध्दा तालुक्यातील काही गाव अंधारातच आजही त्या गावात वीज पोहचली नाही,या सर्व बाबी लक्षात घेत मोहन नामेवार भारतीय जनता पक्ष एटापल्ली यांच्या वतिने तहसीलदार एटापल्ली यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्यचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांसाठी निवेदनाद्वारे साखळे घालण्यात आले.
निवेदनातून,तालुक्यात रोजगाराच्या साधन नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढत चालली आहे,करिता रोजगार उपलब्ध करून घ्यावा,तालुक्यात वनहक्क दावे प्रलंबीत असून तात्काळ मार्गी लावा व आमच्या आदिवासी व वनहक्क दावेदारांना समाधान करावे.समूदायास कायदेशीर रित्या संरक्षणाचा कोणताच अधिकार नव्हता.३१ डिसेंबर २००७ पासून या कायद्याच्या कलम ५ अन्वये समूहांना हे हक्क प्राप्त झाले.ग्रामसभा सामूहिक वनसंसाधनाचे वन्यजीवन,वने व जैवविविधता वापरासाठी मुभा व रक्षण व वापरासंबंधीचे नियम करू शकते आणि या नियमांचे पालन होत नसल्यास,ग्रामसभेला योग्य ती पावले उचलण्याचे अधिकारही आहेत (कलम ५ (ड)). म्हणूनच जर वन विभागालादेखील गुरुचरण जमीन किंवा सामूहिक जमिनीवर वृक्ष लागवड करायची असेल तर, या सामूहिक वनसंसाधनांवर असलेले अधिकार समूहाचे आहेत असे म्हणून ग्रामसभा हे काम थांबवू शकतात. जंगल जर खाण किंवा इतर कामांसाठी वापरले जात असेल तर हे जंगल सामुहिक वनसंसाधन आहे व त्याचे मूळ रहिवासाचे स्थान तसेच सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसाचा भाग असल्याने त्यावर त्याचा हक्क आहे व त्याचे रक्षण करण्याचा त्यांना अधिकार आहे असा दावा ग्रामसभा करू शकते.याचा अर्थ वनविभाग किंवा सरकार किंवा जंगल लुटारूंनी काहीही ठरवले तरी गाव समूह त्याला विरोध करून गाव समूहाचे निर्णय अंमलात आणू शकतात आणि त्याच्या जंगलाचे रक्षण करू शकतात करिता वन हक्क पट्टे आमच्या आदिवासी बांधवाना मिळावी.तालुक्यातील प्रत्येक गावात शासनाचे प्रत्येक योजना प्रत्येक घरी पोचण्याची उपाययोजना करून शासनाचे यंत्रणा व शासकीय अधिकारी कर्मचारी यांना सज्ज करून घरोघरी योजनेचा लाभ मिळावा करीत पर्यंत करावे.तालुक्यातील मजगी,शेत तडे,बोडी मंजूर करून या पासून मिळणारा लाभ करिता सर्व नागरिकांना संबंधित अधिकारी मार्फत मार्गदर्शन करण्याकरिता सज्ज करावे.तालुक्याचा मुख्य ठिकाणी फक्त एकच बी.एस.एन.एल कंपनीचा नेटवर्क असतो.नागरीकांना आपल्या ऑनलाईन कामाकरीत शेकडो दुरून रस्ताअभावी नाल्यातून,पाऊलवाट धरून तालुकास्थाळी यावे लागते,तालुक्यातील अनेक क्षेत्र नेटवर्क पासून दूर आहे अशा परिस्थितीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते,करिता तालुक्यात प्रत्येक ठिकाणी बी.एस.एन.एल सह खाजगी कंपनीचा नेटवर्क उपलब्ध करून द्यावी.तालुक्यातील नागरिकांनाचा आरोग्य धोक्यात असून तालुक्यात अनेक ठिकाणी आरोग्य सेवा नसल्याने ग्रामीण भागातिला लोकांना ६०-७० किमी चा प्रवास करीत ग्रामीण रुग्णालयात यावे लागते रास्त व्यवस्थित नसल्याने व वाहतूक सेवा सुर्डीत नसल्याने अनेक नागरीकांची जिवीत हानी होत आहे करीता तालुक्यातील ग्रामीण भागात एन.एम सेंटर सुरू करण्यात यावी व तालुक्याचा ठिकाणी सुसज्जन कर्मचारी वर्ग द्यावा.एटापल्ली ते कसनसुर मार्ग अर्धवट झाले असून या अर्धवट कामा मुडे नागरिकांना ये-जे करण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत आहे व अर्धवट रस्त्यामुळे अपघात वाढत चालले आहे तरी एटापल्ली ते कसनसुर रास्ता तात्काळ पूर्ण करण्याचा आदेश देण्यात यावे.या सर्व प्रलंबित समस्या तात्काळ मार्गी लावण्याकरीत भाजपा तर्फे निवेदन सादर करण्यात आले आहे.
यावेळी मोहन नामेवार भाजपा एटापल्ली,अशोक पुल्लूरवार माजी तालुका अध्यक्ष एटापल्ली,सम्मा जेट्टी,उष्नाजी मेडिवार,अजय सडमेक,बाबला मुजुमदार,तिरू चापले,अक्षय सडमेक व सर्व भाजपाचे सदस्य उपस्थित होते.
एटापल्ली तालुका अति संवेदनशील असला तरी भाजपा तर्फे कोणत्याना कोणत्या माध्यमातून विकासाकडे जोडण्याकरिता प्रयत्न सुरु आहे.भाजपाची यंत्रणा सज होऊन कामात लागली असून काही दुसऱ्या पक्षातील नेत्यांनी भाजपात प्रवेश केला असून त्यांच्या पाठीमागे तालुक्यातील शेकडो नागरीक भाजपात जाहीर प्रवेश करीत आहे इ6 आता भाजपाची पकड एटापल्ली तालुक्यात मजबूत झाली असून आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूकित भाजपाचा झेंडा फडकणार असून त्याकरीता कार्यकर्तेनी कंबर कसली असल्याचे चर्चेत आहे.येत्या काळात एक हाती सत्ता असेल असे भाजपा कार्यकर्त्यांन कडून बोलल्या जात आहे.कोणाची सत्ता प्रस्थापित होईल याकडे सर्वांचे लक्ष आहे.







