Home गडचिरोली शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अर्ज दि. 31 मार्च पर्यंत सादर करावेत

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अर्ज दि. 31 मार्च पर्यंत सादर करावेत

76

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अर्ज दि. 31 मार्च पर्यंत सादर करावेत

 

गडचिरोली,(जिमाका)दि.27: दि. 14 डिसेंबर 2022 अन्वये शासननिर्णयानुसार काही खेळाडूंचे फेडरेशन कप स्पर्धांचे गुणांकन होत नसल्या कारणाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या वर्षाकरीता अर्ज सादर करू शकले नाहीत. यास्तव त्यांचे नुकसान होऊ नये व सदर खेळाडू पुरस्कारापासून वंचित राहू नये. याकरीता अशा खेळाडूंनी (शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरीता पात्र खेळांमधील ज्या खेळांच्या फेडरेशन कप स्पर्धा होतात असे सहभागी/प्राविण्यप्राप्त खेळाडू फक्त) त्यांचे प्रस्ताव व विहीत नमून्यातील अर्ज ( खेळाडू) दि. 31 मार्च, 2023 कार्यालयीन वेळेपर्यंत संबंधित जिल्ह्यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे सादर करावेत, असे क्रीडा विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.

****

Don`t copy text!