Home गडचिरोली राजाराम खांदला येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरा* *माजी...

राजाराम खांदला येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरा* *माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई यांच्याहस्ते विधिवत पुजा व महाप्रसाद वितरण

90

*राजाराम खांदला येथे श्रीराम नवमी उत्साहात साजरा*

 

*माजी जि प अध्यक्ष भाग्यश्रीताई यांच्याहस्ते विधिवत पुजा व महाप्रसाद वितरण*

 

अहेरी:-तालुक्यातील राजाराम खांदला येथे श्रीराम नवमी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आले.यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांच्या हस्ते श्रीरामाची विधिवत पुजा करून महाप्रसाद वितरण करण्यात आले.

 

राजाराम येथील श्रीराम भक्तांनी रामनवमी निमित्त हनुमान मंदिर परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाचे उदघाटन भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.ताईंनी सुरुवातीला भगवान श्रीराम यांची पूजा करून शेकडो श्रीराम भक्तांच्या समवेत विविध कार्यक्रमात सहभागी झाले.

 

विधिवत पूजा आणि इतर कार्यक्रम आटोपतच ग्रामपंचायत कार्यालय परिसरात महाप्रसाद वितरण करण्याचे ठरले होते.यावेळी परिसरातुन आलेल्या श्रीराम भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी पाहणी करून आस्थेने विचारपूस केले तसेच त्यांनी स्वतः भाविक आणि भक्तांना महाप्रसाद वितरण केले.

 

दिवसभर विविध कार्यक्रमांचा रेलचेल बघायला मिळाला. तर,सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असल्याने भाग्यश्री ताईंनी सर्वांना शुभेच्छा देत निरोप घेतले.यावेळी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!