आर्णी-केळापूरचे माजी आमदार प्रा. राजू तोडसाम यांना जामीन मंजूर

140

आर्णी-केळापूरचे माजी आमदार प्रा. राजू तोडसाम यांना जामीन मंजूर

नागपूर- आर्णी-केळापूर मतदार संघाचे माजी आमदार प्रा. राजू तोडसाम यांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. यामुळे यवतमाळच्या कारागृहात शिक्षा भोगत असलेले प्रा. तोडसाम यांना दिलासा मिळाला आहे.पांढरकवडा येथील महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे लेखापालास ईल शिवीगाळ करून शासकीय कामात हस्तक्षेप, जिवे मारण्याची धमकी दिल्याची त्यांच्या विरोधात तक्रार पांढरकवडा पोलीस ठाण्यात दाखल होती.
केळापूरचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी केळापूर यांनी दिलेली तीन महिन्याची शिक्षा कायम ठेवली आहे. यावर माजी आमदार प्रा. तोडसाम यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पुनर्विलोकन फौजदरी अर्ज क्रमांक १२/२0२१ दाखल केला. प्रा. तोडसाम यांनी पांढरकवडा येथील वीजधारकांना अधिकचे बिल येत असल्याबाबत वाद घातला होता. लेखापाल विलास आकोत यांनी ईल शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली. यावरून आरोपी प्रा. तोडसामविरुद्ध भादंवि २९४, ३५२, ३५३, ५0६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात. सदर प्रकरणात ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक संजय खंदाडे यांनी तपास करून केळापूरच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणात दहा दहा साक्षीदार न्यायालयात तपासण्यात आले. आरोपी माजी आमदार प्रा. राजू तोडसाम हे दोषी असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना भादंवि २९४ कलमातंर्गत ३ महिन्यांची शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावला, तर भादंवि ३५२ कलमातंर्गत ३ महिन्यांची शिक्षा व ५00 रुपये दंड ठोठावण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही.एम. देशपांडे यांच्या एकलपीठाने जामीन मंजूर केला आहे. प्रा. तोडसाम यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अँड. सुनील मनोहर व अँड. अक्षय नाईक यांनी बाजू मांडली.