शिक्षण उपसंचालक शिरसागर यांची किदवाई शाळेला भेट
देसाईगंज- :-
शिक्षण उपसंचालक अल्पसंख्यांक व प्रोढ शिक्षण संचालनालय, पुणेचे रा.गो.शिरसागर, यांनी देसाईगंज येथील रफी अहमद किदवाई शाळेमध्ये 29 जानेवारी रोजी अचानक भेट देऊन सन 2016-2017 ते 2020-2021 शाळेतील अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांच्या प्री.मॅटरिक शिष्यवृत्ती चा संपूर्ण रेकार्ड तपासणी केली.दरम्यान त्यांना कोणताही गैरव्यवहार आढळून आला नसल्याने त्यांनी शाळेच्या कार्यशैलीबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी त्यांच्या सोबत शिक्षण उपनिरीक्षक, विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूरचे श्री.राम चव्हाण,सहा.प्रकल्प अधिकारी तथा शिक्षणाधिकारी भंडाराचे डाॅ. ज.अ.वाकोडकर, गडचिरोली जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी रमेश उचे,प्रशांत तम्बेवार, देसाईगंज पंचायत समिती चे केंद्र प्रमुख विजय बन्सोड उपस्थित होते.
रेकार्ड चेक करते वेळी कोणत्याही अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थी फेक म्हणुन शिष्यवृत्ती चे फार्म आढळले नाही. उत्पन्नाचे दाखले तहसीलदार यांच्या अधिकृत स्वाक्षरीचे घेउनच मुलांचे शिष्यवृत्ती चे फार्म भरण्यात यावी अशी ताकीद शाळेच्या मुख्याध्यापकांना देण्यात आली.
पहील्यांदाच शाळेत भेट दिल्याबद्दल उपशिणाधिकारी रमेश उंचे,माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सैय्यद शफीकुदिन,प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक मो.आरीफ शेख यांच्या वतीने पुणे, नागपूर, गोंदिया वरून आलेल्या सर्व अधिका-यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.






