जनता महाविद्यालय, चंद्रपूर येथील सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत
चंद्रपूर :
चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी डॉ. अशोक जिवतोडे व अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई अशोक जिवतोडे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष यांच्या मार्गदर्शनात जनता महाविद्यालयाचे सहा विद्यार्थी गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र २०२१-२२ च्या प्रकाशित झालेल्या गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून गुणवत्ता यादीत अव्वल येण्याची महाविद्यालयाची परंपरा कायम राखून महाविद्यालयाने शैक्षणिक दर्जा उत्तरोत्तर वाढत असल्याचे सिद्ध केले. पदवी परीक्षेत विज्ञान शाखेतून रितीक उपरे याने गुणवत्ता यादीत पाचवे स्थान मिळवीले आहे. तर प्रियदर्शन गहुकर याने भौतिकशास्त्र विषयात अव्वल स्थान मिळवत गुणवत्ता यादीत प्रथम स्थान मिळविले आहे. तर विज्ञान शाखेत रसायनशास्त्र विषयात चेतन सोनटक्के याने दूसरे स्थान पटकाविले आहे. तसेच हर्षल पेचे याने पाचवे स्थान गुणवत्ता यादित मिळविले आहे.
वाणिज्य शाखेअंतर्गत येणा-या गुणवत्ता यादीत काजल डाखरे हिने पदव्युत्तर परीक्षेत सातवे स्थान मिळविले आहे.
गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिल, संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य तथा ज्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले असे प्राध्यापक वृंद व महाविद्यालयात उपलब्ध सोई-सुविधा यांना दिले आहे.
तसेच गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. के. सी. पाटिल, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य प्रा. व्ही. एस. बोढाले आणि कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. ए. के. महातळे व इतर प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.





