पत्रकारांच्या कर्जत मेळाव्यासाठी राबणाऱ्या हातांचे
अ.भा. मराठी पत्रकार परिषदेकडून शतश: आभार
मुंबई : 7 एप्रिल रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे अ.भा. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दैनिक ‘सामना’ चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत, स्वागताध्यक्ष कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार यांच्या सहकार्याने, परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस हाजी मन्सुरभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या तालुका पत्रकार संघ, जिल्हा पत्रकार संघ आदर्श पुरस्कार वितरण व पत्रकारांच्या राज्यस्तरीय मेळाव्याचे वृत्तांत सर्व वृत्तपत्र, चॅनल्स, सोशल व प्रिंट मिडीया यांनी भरभरून प्रसिद्ध केले तसेच कर्जत जामखेडसह अहमदनगर जिल्ह्यातील पत्रकार, कर्जतचे स्थानिक नेतृत्व, जनतेसह मेळावा यशस्वी करणाऱ्या, राबणाऱ्या हातांचे मराठी पत्रकार परिषदेचे राज्य जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन, सोशल मिडीयाचे राज्यप्रमुख अनिल वडनेरे यांनी शतश: आभार मानले आहेत. राज्यभरातून अपेक्षेपेक्षा अधिक पत्रकार येऊनही सुत्रबद्ध नियोजन स्थानिकांचे परिश्रम यामुळे हा मेळावा यशस्वी होण्यास मदत झाली. मेळाव्यात राज्यभरातील पत्रकारांची उपस्थिती पाहता सर्वात जुनी विश्वासहर्ता असणारी अग्रगण्य सर्वमान्य मराठी पत्रकार परिषद हीच पत्रकारांची अधिकृत संघटना आहे यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले असेही पत्रकात नमुद करण्यात आले आहे.
*****
म. संपादक,
कृपया वरील वृत्त प्रसिद्ध करावे ही विनंती.
अनिल महाजन, राज्य जनसंपर्क प्रमुख, मराठी पत्रकार परिषद- मुंबई. मो. 99229 99671
गो. पि. लांडगे, प्रसिद्धी प्रमुख, मराठी पत्रकार परिषद- धुळे, नंदुरबार. मो. 94227







