*बिग ब्रेकिंग न्यूज* *चंद्रपूर जिल्हा ओबीसी विभागाचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री.दिवाकर प्रभाकर निकुरे यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा…!* *चिमूर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसची गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर

82

*बिग ब्रेकिंग न्यूज*

*चंद्रपूर जिल्हा ओबीसी विभागाचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री.दिवाकर प्रभाकर निकुरे यांचा जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा…!*

 

*चिमूर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसची गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर.*

 

*काम करणाऱ्या माणसाला पदाची आवश्यकता नसते – श्री.दिवाकर निकुरे.*

 

मागील कित्येक वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये काम करीत असलेले तसेच सध्या चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये आपली संपूर्ण ताकद झोकुन काँग्रेस पक्ष मजबुत करीत असलेले सक्रिय नेते श्री.दिवाकर प्रभाकर निकुरे यांनी आपल्या चंद्रपूर जिल्हा ओबीसी विभागाचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठी कडे सोपिवला आहे.

दोन महिन्याअगोदरच पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली होती आणि नंतर अगदी जोमात त्यांनी आपले कार्य समोर नेत आहेत परंतु त्यांच्या नियुक्ती पासूनच स्थानिक चिमूर विधानसभा मध्ये काँग्रेसचा एक गट त्यांच्या विरोधात थेट प्रदेश मध्ये जाऊन त्यांच्या तक्रारी करण्यास सुरुवात केली आणि कुठतरी निकुरे यांना अडचणीत आणण्याचा वारंवार प्रयत्न करीत असतात,याच गटबाजीमुळे निकुरे यांनी आपला राजीनामा दिल्याचे सांगितले आहे.

परंतु जसं काम आजपर्यंत चिमूर विधानसभा मध्ये काँग्रेस पक्षबांधणीचा काम सुरू होते तसेच काम अजून जास्त जोमाने सुरू राहणार आहे आणि गोर-गरीब जनतेला,माझ्या शेतकरी बांधवांना या पुढेही मदत करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे,काम करणाऱ्या माणसाला पदाची आवश्यकता नसते असे दिवाकर निकुरे यांचे म्हणणे आहे.

आणि येत्या १३ एप्रिल २०२३ ला सायंकाळी ५ वाजता चिमूर येथे होणाऱ्या बहुजनांचा संघर्ष आणि दिशा या समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा या वेळेस निकुरे यांनी केले आहे.