चार हजाराची लाच घेताना सरपंच व ग्रामपंचायत सदस्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.

65

चार हजाराची लाच घेताना सरपंच व ग्रामपंचायत सदस्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.

 

गडचिरोली

गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना चार हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली च्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ही घटना दिनांक 11 एप्रिल मंगळवारी घडली.

 

सोनाली गोकुलदास नागापुरे वय 32 वर्ष सरपंच अमीर्झा व अजय भास्कर नागापुरे वय 40 वर्ष सदस्य ग्रामपंचायत अमिर्झा असे लाच घेताना अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.

 

अमीर्झा ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनाली नागापुरे व सदस्य अजय नागापुरे यांनी आपल्या आर्थिक फायद्याकरीता तक्रारदाराकडून अमीर्झा ते अमिर्झा टोली येथिल गटारे उपसण्याचे व ट्रॅक्टरने मलबा फेकण्याचा कामाच्या चेकवर सही करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. सरपंच यांच्या राहत्या घरी दोन्ही आरोपींना अडीच हजार व पंधराशे रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलिस अधिक्षक राहूल माकणीकर व अप्पर पोलीस अधिक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनाखली श्रीधर भोसले पोलिस निरिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक गडचिरोली यांच्या तपासी पथकाने केली