किसाननगर (व्याहाड खुर्द) येथील तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व बौद्ध विहार लोकार्पण कार्यक्रम मा.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचा हस्ते संपन्न

62

*किसाननगर (व्याहाड खुर्द) येथील तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व बौद्ध विहार लोकार्पण कार्यक्रम मा.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचा हस्ते संपन्न*

__________________________________________________

 

*जगात भारताची ओळख तथागत बुद्धांची जन्मीभूमी म्हणून,तथागत बुद्ध हे वैद्यानिक दृष्टिकोनाचे केंद्रबिंदू- माजी मंत्री वडेट्टीवार*

__________________________________________________

 

*दिनांक: ११ एप्रिल २०२३*

*सावली*

 

*सम्यक बौद्ध समाज किसाननगर (व्याहाड खुर्द) यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त थायलंड येथील तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व बौद्ध विहार लोकार्पण कार्यक्रम आज स्व.दानशूर अर्जुनदास बीके परिसर किसाननगर येथे ११ एप्रिल २०२३ ला पार पडले. यावेळी उपस्थित राहून माजी मंत्री व विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांनी समाज बांधवांशी संवाद साधला.*

 

*तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व बौद्ध विहार लोकार्पण कार्यक्रमात मा.आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचा शाल, श्रीफळ व तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.*

 

*सम्यक बौद्ध समाज किसाननगर (व्याहाड खुर्द )यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व बौद्ध विहार लोकार्पण कार्यक्रम आज पार पडले. यावेळी उपस्थित राहून समाज बांधवांशी संवाद साधला.जगात भारताची ओळख तथागत बुद्धांची जन्मीभूमी म्हणून,तथागत बुद्ध हे वैद्यानिक दृष्टिकोनाचे केंद्रबिंदू, छ.शिवाजी महाराज, फुले,शाहू, आंबेडकर चळवळीतुनच देश जागतिक पातळीवर अग्रस्थानी येऊ शकतो. महापुरुष्यांचा विचारातून देश विकसित होऊ शकतो.माजी मंत्री मा.विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन.*

 

या *वेळी माजी बांधकाम सभापती दिनेश पा.चिटणुरवार, सावली ता.कॉंग्रेस.कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने,सिंदेवाहीचे नगराध्यक्ष स्वप्नील कावळे,व्याहाड खुर्दच्या सरपंच सुनीता उरकुडे, उपसरपंच भावना बीके,जेष्ठ कार्यकर्ते गोपाल रायपूरे,माजी जि.प.सदस्य मनीषा जवादे,रुपाली कन्नाके, वि.वी.सहकारी सो.अध्यक्ष दीपक जवादे, विद्यासागर बीके तसेंच सम्यक बौद्ध समाज किसाननगरचे अध्यक्ष सुरेश बांबोळे,अनिल म्हशाखेत्री, संजय मजोके आदी कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते*