*गडचिरोली विधानसभा क्षेत्रात २०८ ठिकाणी “मन की बात कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन”*
*भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांच्या मार्गदर्शनात व आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या नेतृत्वामध्ये नियोजनबद्द पद्धतीने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन*
*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सर्व तालुकाध्यक्ष, शक्ती केंद्रप्रमुख , बुधप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे केले अभिनंदन*
*दिनांक ३० एप्रिल २०२३ गडचिरोली*
*देशाचे लाडके लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या १०० व्या “मन की बात” या कार्यक्रमाचे गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये २०८ ठिकाणी भाजपा जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे यांच्या मार्गदर्शनामध्ये व आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या नेतृत्वामध्ये नियोजनबद्ध पद्धतीने यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले. याबद्दल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील तीनही तालुकाध्यक्ष ,शहराध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख , बुधप्रमुख व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.*
*गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये चामोर्शी तालुक्यात ११५ ठिकाणी, गडचिरोली तालुक्यामध्ये ४० ठिकाणी, गडचिरोली शहरांमध्ये ३८ ठिकाणी तर धानोरा तालुक्यामध्ये १५ ठिकाणी असे एकूण २०८ ठिकाणी शंभराव्या मन की बात कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले याबद्दल आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी तालुक्याचे अध्यक्ष दिलीपजी चलाख, गडचिरोलीचे शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे, तालुक्याचे अध्यक्ष रामरतनजी गोहणे तर धानोराचे अध्यक्ष शशिकांतजी साळवे यांचे व कार्यक्रमात सहभागी सर्व पदाधिकारी ,शक्ती केंद्रप्रमुख ,बूथप्रमुख व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.*







