मार्कंडेश्वर मंदिराचे काम मार्गी लागू दे*  *आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांचे मार्कंडेश्वराला साकडे* *आज पासून मार्कंडा देव येथे महादेवाचे जागृती अनुष्ठानाला सुरुवात*

50

*मार्कंडेश्वर मंदिराचे काम मार्गी लागू दे*

 

*आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांचे मार्कंडेश्वराला साकडे*

 

*आज पासून मार्कंडा देव येथे महादेवाचे जागृती अनुष्ठानाला सुरुवात*

 

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी घेतले मार्कंडेश्वराचे दर्शन*

 

*श्री कार्तिक स्वामी धाम हरणघाटचे संत श्री मुरलीधर महाराजानी सुरू केले जागृती अनुष्ठान*

 

*दिवस-रात्र २४ तास चालणार हे धार्मिक विधीचे अनुष्ठान*

 

*दिनांक ५ मे २०२३ गडचिरोली*

 

*मार्कंडेश्वर मंदिराच्या पूर्णत्वासाठी श्री श्री कार्तिक स्वामी धाम हरणघाटचे संत श्री मुरलीधर महाराज यांनी आज ५ मे पासून १५ मे पर्यंत भगवान महादेवाचे जागृती अनुष्ठान सुरू केले असून १५ मे २०२३ ला जलाभिषेकाच्या धार्मिक विधीसह या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. हे आमचे अनुष्ठान स्वीकारावे व भक्तांवर कृपा करून मंदिराचे बांधकाम पूर्णत्वास न्यावे असे साकडे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आज मार्कंडा देव येथे भगवान महादेवाच्या अनुष्ठानच्या शुभारंभ प्रसंगी केले.*

 

*आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मार्कंडेश्वर मंदिराच्या अनुष्ठानाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली, यावेळी त्यांनी या ११ दिवस चालणाऱ्या अनुष्ठान व जलाभिषेक या धार्मिक विधीच्या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भामध्ये मंदिराचे पदाधिकारी परिसरातील धर्माचार्य व भक्त भाविकांशी चर्चा केली.*

 

*याप्रसंगी मार्कंडा देवस्थानचे अध्यक्ष गजानन जी भांडेकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रमेशजी बारसागडे, तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, बंगाली आघाडी अध्यक्ष सुरेश शहा, जयराम चलाख, राजू घोंगरे, सुरपाम साहेब, आबाजी पाटील दहेलकर, भोजराज भगत ,रामचंद्र वरवडे, संजय चलाख, भुवनेश्वर चुधरी, भास्कर बुरे, प्रतीक राठी, नीरज रामानुजवार बाळराजे सर, शेषराव कोहळे,गायकवाड सर , संजूभाऊ खेडेकर, साईनाथ बुरांडे ,अमोल महाराज, कनेल चलाख, नानाजी बुरांडे, दिवाकर सातपुते, दशरथ बारसागडे, दिलीप नैताम, जाफलवार सर यांचे सह भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते*