गानली समाज शिक्षण व कल्याण मंडळाच्या वतीने संजय पोरेड्डीवार यांचा सत्कार
गडचिरोली : नुकत्याच झालेल्या कृषि उत्पन्न बाजार समिती गडचिरोली च्या संचालक पदी निवड झाल्याने गानली समाज शिक्षण व कल्याण मंडळ गडचिरोली च्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी गानली समाज शिक्षण व कल्याण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश तोडेवार,रवींद्र आयतुलवार,नितीन संगीडवार व कार्यकारणीचे सदस्य उपस्थित होते.