पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चे गुरूवारी धरणे आंदोलन
गडचिरोली : पत्रकारिता आणि पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हाभरात व्हॉईस मीडियाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत.
माध्यमांकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पहिले जाते. मात्र माध्यमकर्मिंचे प्रश्न सोडविण्यासाठी उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेकडून राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या माध्यमातून शासानापुढे काही मागण्या ठेवण्यात येणार आहेत. त्यात पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू जीएसटी रद्द करावा. पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोनात जीव गमावलेल पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण ‘क’ वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे लघु दैनिकांनाही मध्यम ( ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्यप्रमाणात जाहिराती द्याव्यात. या मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय आणि तहसील कार्यालयसमोर गुरूवारी सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत धरणे आंदोलन करणार आहे. तरी पत्रकारांनी मोठ्या संख्येत धरणे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडमवार, जिल्हा सरचिटणीस कैलास शर्मा, विदर्भ कार्याध्यक्ष सुमित पाकलवार यांनी केले आहे.
……………







