*गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध*
*मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे यांनी आ.डॉ. देवरावजी होळी यांना केले आश्र्वस्त*
*मुंबई मंत्रालयात आमदार महोदयांनी घेतली मा. मुख्यमंत्री यांची भेट*
*जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही*
*दिनांक १७/५/२०२३ मुंबई*
*गडचिरोली जिल्ह्याच्या विविध समस्यांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी व विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा याकरिता आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मा. मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांची भेट घेतली असता गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकडे आपले पूर्णतः लक्ष असून जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत ना एकनाथजी शिंदे यांनी आमदार डॉ देवराव जी होळी यांना आश्र्वस्त केले.*
*या भेटीच्या प्रसंगी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील राजीव उपसा सिंचन योजना, वसा पोर्ला उपसा सिंचन योजना , गोगाव उपसा सिंचन योजनेद्वारा शेतीला पी.डी.एन द्वारे पाणीपुरवठा करणे, आदी सिंचन प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.*
*यावेळी त्यांनी गडचिरोली नगर परिषद, चामोर्शी व धानोरा नगरपंचायत भवनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली*
*चामोर्शी बस स्थानकासाठी लागणारा उर्वरित निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा अशीही विनंती त्यांनी यावेळी केली.*
*यावेळी त्यांनी गोंडवाना विद्यापीठाच्या बांधकामासाठी प्रस्तावित असलेला ८८४ कोटींचा प्रस्ताव मंजूर करून लवकरात लवकर विद्यापीठाच्या बांधकामाला मंजुरी द्यावी अशी विनंती करीत जिल्ह्यात नव्याने मंजूर झालेल्या मेडिकल कॉलेज करिता आवश्यक असणारा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली.*
*यावेळी आमदार महोदयांनी गडचिरोली जिल्ह्यात आरोग्यासह विवीध विभागात असणारी रिक्त पदे भरण्याबाबत चर्चा करुन ही पदे तातडीने भरण्यात यावी अशी विनंती केली.*