*ब्रह्मपुरी येथे छ.शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळाच्या निमिताने खासदार अशोकजी नेते,व माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.*
दिं. ०२ जुन २०२३
ब्रम्हपुरी: छ.शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने,आनंदाने भव्य दिव्य रोषणाईत छत्रपती शिवरायाच्या विविध वेशभूषेत मध्यें बाल गोपालांनी ब्रम्हपुरी या ठिकाणी साजरा केला.
खासदार श्री. अशोकजी नेते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा ! व सर्वांना मनःपुर्वक शुभेच्छा देत छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे, जनतेचे राजे होते. त्यांनी जनतेच्या हितासाठी जनकल्याणासाठी शासन सुशासन व प्रशासन हे जनतेच्या हितकारकसाठी केलेले कार्य अतिशय मोलाचे होते.त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करुन त्यांचे विचार अंगीकारावा असे विचार याप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी व्यक्त केले.
त्यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोक नेते,श्री मा.प्रा. अतुलभाऊ देशकर माजी आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र प्रा.प्रकाशभाऊ बगमारे भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, मा.अरविंदजी नंदूरकर भाजपा शहर अध्यक्ष, मा.प्रा. सुयोगजी बाळबुद्धे भाजयुमो शहर अध्यक्ष, मा.अमितजी रोकडे युवा नेते तसेच मोठया संख्येने कार्यकर्ते,बालगोपाल,नागरिक उपस्थित होते.