५%निधी साठी कराव्या लागणाऱ्या दिव्यांग नोंदणीला मुदतवाढ दया

182

५%निधी साठी कराव्या लागणाऱ्या दिव्यांग नोंदणीला मुदतवाढ दया
प्रहार संघटना नागभीड वतीने नगरपरिषद ला निवेदन सादर

नागभीड:- दरवर्षी नगरपरिषदच्या  स्वउत्पन्नातून दिव्यांग लोकांना एकूण जमा होणाऱ्या रकमेच्या ५%निधी हा स्थानिक दिव्यांग लोकांवर खर्च करण्याबाबत शासननिर्णय आहे  त्याकरिता दरवर्षी नगरपरिषद मध्ये दिव्यांग नोंदणी करावी लागते,त्याप्रमाणे यावर्षी ही दिव्यांग नोंदणीचा कार्यक्रम नगरपरिषद मार्फत घोषित करण्यात आला परंतु त्याची माहिती नागभीड नगरपरिषद मधील बहुतांश दिव्यांग रहिवासी लोकांना मुदत उलटूनही मिळाली नाही,त्यामुळे आपल्याला नोंदणी पासून वंचित राहावे लागून योजनेचा लाभ घेता येणार नाही अशी कैफियत दिव्यांग बांधवांनी नागभीड प्रहार संघटना यांच्यासमोर मांडली.
तेव्हा तात्काळ प्रहार संघटना नागभीड चे कार्यकर्ते व काही दिव्यांग बांधव यांनी नगरपरिषद येथे जाऊन  भेट घेऊन आपल्या नगरपरिषद द्वारे राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग नोंदणी कार्यक्रमची माहिती शेवटच्या तारखेपर्यंत बहुतांश दिव्यांग बांधवांना माहिती झालेला नाही तेव्हा अनेक दिव्यांग बांधव शासनाच्या या योजने पासून वंचित राहतील , तेव्हा एकही दिव्यांग बांधव शासनाच्या योजनेपासून