आलापली येते धोबी समाजासाठी समाज भवनाच्या भूमिपूजन 

154

आलापली येते धोबी समाजासाठी समाज भवनाच्या भूमिपूजन 
▪️जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते सम्पन्न ▪️
▪️आलापली:- धोबी समाजाच्या सांस्कृतीक तथा परम्परागत रूढी परंपरा,चालीरीती यांचे जोपसना करण्यासाठी व समाजाच्या कार्यक्रम घेण्यासाठी समाजाच्या समाजभवन नसल्याने अडचण होत होती.
सदर धोबी समाजबांधवानी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली असता मागणीची दखल घेवुन जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिले असून येत्या काही दिवसांत समाज भवनाच्या बांधकाम पूर्ण होईल.
आज जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते सदर समाज भवनाच्या बांधकामाच्या भूमिपूजन सोहळा पार पाडला.
या भूमिपूजनाला श्री.संतोष वर्मा,मोरेश्वर मेडपल्लीवार,शंकरराव यमकुर्तीवार,एकनाथ गुंडावार,प्रकाश मेडपल्लीवार,संजय मेडपल्लीवार,दिलीप गंजीवार माजी सरपंच,संतोष तोडसाम, चंदू बेज्जलवार,जुलेख शेख,गेडाम म्याडम ग्रामसेवक आलापल्ली,रामटेके साहेब(JE),सचिन वर्मा,जुनेद शेख,आदि उपस्थित होते.