Home Breaking News गडचिरोली शहरात पोळयासाठी दारूचा पुरवठा ! साडेतीन लाखाची दारू जप्त *  दोन...

गडचिरोली शहरात पोळयासाठी दारूचा पुरवठा ! साडेतीन लाखाची दारू जप्त *  दोन दारू तस्करांवर गुन्हा दाखल

150

गडचिरोली शहरात पोळयासाठी दारूचा पुरवठा ! साडेतीन लाखाची दारू जप्त *  दोन दारू तस्करांवर गुन्हा दाखल

वृत्त्ववाणी न्युज गडचिरोली जिल्हयात दारूबंदी असली तरी अवैधरित्या दारूविक्री मोठया प्रमाणात केली जात आहे. सणासुदीच्या दिवसात तर दारू विक्रीला मोठया प्रमाणात ऊत येते. पोळा सणाला दारू विक्री मोठया प्रमाणात होत असल्याने दारूविक्रेते जिल्हयाबाहेरून दारू आणून किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा करतात. पोळा सणाच्या पर्वावर गडचिरोली शहरात दारूचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी शहरातील कॅम्प एरीया परिसरातून एक वाहनातून तब्बल साडेतीन लाखाची दारू जप्त केली.

राकेश इटकरवार रा. गुरवळा आणि सचिन येनप्रेडीवार रा. गडचिरोली अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या इसमाची नावे आहेत.

पोळा सणाला दारूची मागणी मोठया प्रमाणात असते. त्यामुळे विक्रेते सणाच्या दोनतीन दिवसापुर्वी दारूचा पुरवठा करतात. पोळा सणाच्या पर्वावर होणारी दारू तस्करी लक्षात घेता गडचिरोली पोलीस अलर्ट होते. १२ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास कॅम्प परिसरात एका शाळेच्या मोकळया प्रांगणात एमएच ३३ ए / ४११ क्रमांकाचे चारचाकी वाहन उभे असल्याची माहिती प्राप्त होताच गडचिरोली पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक अरूण फेगडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह धाड टाकली. यावेळी वाहनात ३ लाख ४० हजाराची दारू आढळून आली. दारू आणि ८ लाखाचे वाहन असा ११ लाख ११ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. पोलीसांच्या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

Don`t copy text!