गडचिरोली तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींपैकी 10 ग्रामंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा

135

गडचिरोली तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींपैकी 10 ग्रामंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा

16 पैकी 10 ठिकाणी सरपंच तर 5 ठिकाणी भाजपाचे उपसरपंच

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केले सर्व विजयी सरपंच उपसरपंच यांचे अभिनंदन

 

दिनांक 15 फेब्रुवारी 2019 गडचिरोली

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात लढविण्यात आलेल्या गडचिरोली तालुक्यातील सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये गडचिरोली तालुक्यातील 16 ग्रामपंचायती पैकी 10 ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचे सरपंच तर 6 ग्रामपंचायतीवर उपसरपंच निवडून आले असून नवनियुक्त सरपंच उपसरपंच यांचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी अभिनंदन केले आहे
गडचिरोली तालुक्यातील नवरगाव येथे सुनिता देशमुख, अमिर्झा सोनालीताई नागापुरे , विहिरगाव ज्योती तलांडे, डोंगरगाव अश्विनी सोदूरवार ,आंबेशिवनी सरिता टेंबुर्णे मौशीखांब रंजिताताई पेंदाम,चुरचुरा प्रमोद मुंघाटे, सावरगाव वृंदा रवींद्र मडावी खरपुंडी ज्योत्स्ना म्हशाखेत्री इंदाळा मनोज जेंगठे हे भाजपाचे सरपंच निवडून आले आहेत तर उपसरपंचपदी नवरगाव -आशा भोयर, डोंगरगाव पौर्णीमा पालकवार, मौशीखांब रूपालीताई गंधलवार , येवली प्रीतम गेडाम , खरपुंडी ऋषी नैताम, इंदाळा विलास गेडाम या भाजपाच्या उमेदवारांनी बाजी मारली आहे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी सर्व नवनियुक्त सरपंच ,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचे अभिनंदन केले आहे