धानोरा नगर पंचायतीमधील प्रलंबीत विकास कामे. तातडीने मार्गी लावा
आमदार डॉ देवरावजी होळी
धानोरा नगर पंचायतीच्या विकासकामांच्या पूर्ततेसाठी आमदार डॉ देवराव जी होळी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न
दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ गडचिरोली
धानोरा नगर पंचायत क्षेत्रातील प्रलंबीत विकास कामांच्या पूर्ततेसाठी सदर बैठक आयोजित करण्यात आली असून अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे प्रलंबित असलेली कामे सूरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश आमदार डॉ देवरावजी होळी यांनी धानोरा नगर पंचायतीच्या आढावा सभेत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. आढावा बैठकीला नगराध्यक्षा सौ लीनाताई साळवे, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी बेंबरे, उपाध्यक्ष बाळू भाऊ उंदिरवाडे, नायब तहसीलदार चंदू पिद्दुलवार, भाजपा ज्येष्ठ नेते साईंनाथजी साळवे नगरसेवक विनोद निंबोरकर , सुभाष धाईत, करअधिकारी कथडकर लेखापाल देवेंद्र गोटमारे, प्रामुख्यानं उपस्थित होते
धानोरा नगराच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्न करुन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. जिल्हा वार्षिक योजनेतून नगरोत्थान अभियानांतर्गत 2019 -20 करिता 80लक्ष रुपये,2020 -21 चे 53 लक्ष 15हजार, नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत 2019 -20 करिता 3 कोटी 22 लक्ष ,2020 -21 करिता 1 कोटी 13 लाख, नागरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत 2019 -20 करिता 35 लक्ष, अग्निशमन सेवा व बळकटीकरण योजनेअंतर्गत 2019-20 करिता 26 लक्ष, वैशिषटयपूर्ण विशेष अनुदान ठोक अनुदान ठोक तरतूद अंतर्गत 2018-19 मध्ये 4कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त होऊन सुद्धा अजून पर्यंत कामे करण्यात आले नाही.त्यामुळे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सदर कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी काम करावे असे निर्देशही दिले.
सिटी सर्वे नगरपंचायत क्षेत्रात तात्काळ सुरू करणे, हद्द वाढविणे व वाढीव गावठाण संदर्भातील प्रलंबीत कामाविषयी तसेच डि पी प्लॅन ला कंत्राटदाराच्या अनास्थेमुळे होत असलेल्या विलंबाबत आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आपली नाराजी व्यक्त केली धानोरा नगर पंचायतीमधील प्रलंबीत विकास कामे. तातडीने मार्गी लावा
आमदार डॉ देवरावजी होळी
धानोरा नगर पंचायतीच्या विकासकामांच्या पूर्ततेसाठी आमदार डॉ देवराव जी होळी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न
दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ गडचिरोली
धानोरा नगर पंचायत क्षेत्रातील प्रलंबीत विकास कामांच्या पूर्ततेसाठी सदर बैठक आयोजित करण्यात आली असून अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे प्रलंबित असलेली कामे सूरू करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश आमदार डॉ देवरावजी होळी यांनी धानोरा नगर पंचायतीच्या आढावा सभेत उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. आढावा बैठकीला नगराध्यक्षा सौ लीनाताई साळवे, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी बेंबरे, उपाध्यक्ष बाळू भाऊ उंदिरवाडे, नायब तहसीलदार चंदू पिद्दुलवार, भाजपा ज्येष्ठ नेते साईंनाथजी साळवे नगरसेवक विनोद निंबोरकर , सुभाष धाईत, करअधिकारी कथडकर लेखापाल देवेंद्र गोटमारे, प्रामुख्यानं उपस्थित होते
धानोरा नगराच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्न करुन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. जिल्हा वार्षिक योजनेतून नगरोत्थान अभियानांतर्गत 2019 -20 करिता 80लक्ष रुपये,2020 -21 चे 53 लक्ष 15हजार, नागरी दलितेतर वस्ती सुधार योजनेअंतर्गत 2019 -20 करिता 3 कोटी 22 लक्ष ,2020 -21 करिता 1 कोटी 13 लाख, नागरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत 2019 -20 करिता 35 लक्ष, अग्निशमन सेवा व बळकटीकरण योजनेअंतर्गत 2019-20 करिता 26 लक्ष, वैशिषटयपूर्ण विशेष अनुदान ठोक अनुदान ठोक तरतूद अंतर्गत 2018-19 मध्ये 4कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी प्राप्त होऊन सुद्धा अजून पर्यंत कामे करण्यात आले नाही.त्यामुळे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सदर कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी काम करावे असे निर्देशही दिले.
सिटी सर्वे नगरपंचायत क्षेत्रात तात्काळ सुरू करणे, हद्द वाढविणे व वाढीव गावठाण संदर्भातील प्रलंबीत कामाविषयी तसेच डि पी प्लॅन ला कंत्राटदाराच्या अनास्थेमुळे होत असलेल्या विलंबाबत आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आपली नाराजी व्यक्त केली