Home Breaking News एटापल्ली तालुक्यातील कसनसुर चंद्रखंडी मेडिकल धारकास जिल्हा केमिस्ट परिवार हेलपिंग ग्रुप तर्फे...

एटापल्ली तालुक्यातील कसनसुर चंद्रखंडी मेडिकल धारकास जिल्हा केमिस्ट परिवार हेलपिंग ग्रुप तर्फे एक लाखाची मदत

105

एटापल्ली तालुक्यातील कसनसुर चंद्रखंडी मेडिकल धारकास जिल्हा केमिस्ट परिवार हेलपिंग ग्रुप तर्फे एक लाखाची मदत

एटापल्ली : वृत्तवाणी न्यूज

एटापल्ली तालुक्यातील कसनसुर येथील चंद्रखंडी औषदी दुकान नुकतेच काही दिवसांपूर्वी आगीत भस्मात होउन 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाले.

सदर घटनेची माहिती मिळताच गडचिरोली येथील केमिस्ट परिवार हेलपिंग ग्रुपच्या पदाधिकारी यांनी मदतीचे आव्हान केले.व त्यात सर्व सदस्यांनी मदत केली.केमिस्ट संगटनेचे माजी अध्यक्ष विवेकानंद खोब्रागडे,माजी संघटन सचिव श्रीकांत सुरजगडे,मिलिंद बांबोले,व मनोज नैताम यांनी कसनसुर येथे जाऊन दुकानाची पाहणी केली.व चंद्रखंडी दुकानाचे मालक योगेश्वरी तेलकुंटावार हिला केमिस्ट बांधवाकडून जमा झालेली एक लाख रुपयांची मदत केली.कसनसुर सारख्या अति दुर्गम भागात एक महिला केमिस्ट हिमतीने उभी आहे खरच याचा आम्हा केमिस्ट बांधवाना अभिमान आहे.असे गौरवोदगार केमिस्ट पदाधिकारी यांनी काढले.

व नव्याने दुकान लावण्याकरिता औषधा करीता मदतीचे आश्वासन दिले.

Don`t copy text!