कास्ट्राईब कर्मचा-यांच्या समस्या प्राधान्याने निकाली काढणार

132

कास्ट्राईब कर्मचा-यांच्या समस्या प्राधान्याने निकाली काढणार

राजु वलथरे गट विकास अधिकारी पंचायत समिती अर्जुनी मोरगांव यांचे आश्वासन

अर्जुनी मोरगांव:- अर्जुनी मोरगांव तालुक्यातील मागासवर्गीय कर्मचा-यांचे विविध प्रश्न व समस्या निकाली काढण्यासंदर्भात कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा गोंदिया चे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांचे नेतृत्त्वात दिनांक १२/०२/२०२१ ला राजु वलथरे गट विकास अधिकारी पंचायत समिती अर्जुनी मोरगांव यांचे कडे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची बैठक झाली.
याप्रसंगी गट विकास अधिकारी राजु वलथरे पंचायत समिती अर्जुनी मोरगांव यांना जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित “बुद्ध आणि त्यांचा धम्म” हा ग्रंथ भट व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पंचायत समिती विभाग प्रमुख डॉ.विजय राऊत तालुका आरोग्य अधिकारी, कु.प्रियंका किरणापुरे बालविकास प्रकल्प अधिकारी,ज्ञानेश्वर लोहबरे सहाय्यक प्रशासन अधिकारी,अनिल चव्हाण वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी,श्याम लिचडे कनिष्ठ प्रशासन अधिकारी हे उपस्थित होते…यावेळी त्यांनी मागासवर्गीय कर्मचा-यांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सातवे वेतन आयोगान्वे आपले अनिनिस्त असलेल्या सर्व कर्मचा-यांचे आश्वासन प्रगती योजना अंतर्गत १०,२० व ३० वर्षाच्या नियमित सेवेनंतर ची तीन लाखांची सुधारित प्रगती योजना १/०१/२०१६ पासून लागू करणे संदर्भात कार्यवाही करण्यात यावी. पशुसंवर्धन विभाग,आरोग्य विभागासहित मासिक वेतन वेळेवर करणे संदर्भाने कार्यवाही करण्यात यावी. आपले अधिनिस्त असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन वेळेवर करण्यात यावे. एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविकांचे प्रवास भत्ता बिल त्वरीत मंजूर करण्यात यावे. जिल्हा परिषद शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव अविलंब जिल्हा परिषद गोंदिया येथे पाठविण्यात यावे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या सेवापुस्तिका सहावे व सातवे वेतन आयोगाच्या मंजूरसाठी जिल्हा परिषद गोंदिया येथे त्वरीत पाठविण्यात यावे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन विक्री अंशराशीकरण मंजूर झाल्यानंतरही सदर अंशराशीकरण राशी वेळेवर मिळत नाही, ती त्वरीत देण्यात यावी. कर्मचारी, शिक्षक व अधिकारी यांचे वैद्यकीय प्रतिकृती देयके अविलंब जिल्हा परिषद गोंदिया येथे पाठविण्यात यावे. सेवानिवृत्ती च्या उंबरठ्यावर असलेले कर्मचारी, शिक्षक व अधिकारी यांची सेवानिवृत्ती वेतन फाईल्स त्वरीत जिल्हा परिषद गोंदिया येथे पाठविण्यात यावी, तसेच ज्यांची सेवापुस्तक काही कारणास्तव जिल्हा परिषद गोंदिया येथे अडकून पडली असतील तर संबंधित विभागांना पत्र पाठवून सेवापुस्तिकेची त्वरीत मागणी करण्यात यावी. प्राथमिक आरोग्य केंद्र धाबेपवनी अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांचे एल. आय. सी. (विमा), पतसंस्था,ग्राहक सोसायटी १० महिण्यांपासून पाठविण्यात आली नाही, संबंधित अधिकाऱ्यांना खुलासा विचारुन सदर कपात अविलंब संबंधित विभागांना पाठविण्यात यावी, तसेच प्रवास भत्ता बिल, आयकर टीडीएस, आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानधन, कालबध्द पदोन्नती प्रस्ताव प्रलंबित आहेत,त्वरीत कार्यवाही करण्यात यावी.प्राथमिक आरोग्य केंद्र धाबेपवनी येथील कर्मचार-यांचे चार महिन्यांपासून वेतन नाही, यासंदर्भाने कार्यवाही करण्यात यावी.पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी व अधिकारी यांचे कालबध्द पदोन्नती प्रस्ताव तसेच सातवे वेतन आयोगाच्या वेतन निश्चिती साठी सेवापुस्तक जिल्हा परिषद गोंदिया येथे त्वरीत पाठविण्यात यावी.मृतक श्रीमती स्नेहलता गोपाल लाडे सेवानिवृत्त अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी केंद्र मोरगांव क्रमांक १, पंचायत समिती अर्जुनी मोरगांव ह्या दिनांक ३१/१०/२०१७ ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या परंतु आतापर्यंत सेवानिवृत्त एक रकमी पेन्शन राशी मिळाली नाही,ती त्यांच्या वारसदारांना प्रदान करणेसंदर्नभाने कार्यवाही करण्यात यावी.सुभाष राजगडे परिचर जिल्हा परिषद हायस्कूल अर्जुनी मोरगांव यांचे अतिकालीन मंत्र्यांची राशी त्वरीत प्रदान करण्यात यावी, तसेच कालबध्द पदोन्नती प्रस्ताव त्वरीत जिल्हा परिषद गोंदिया येथे पाठविण्यात यावे. जिल्हा परिषद पत्रान्वये शिक्षकांचे दुय्यम सेवापुस्तक तयार करुन अद्ययावत करण्यात यावे.सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षक व अधिकारी यांची पेन्शन दर महिन्याच्या एक तारखेला करणे संदर्भाने कार्यवाही करण्यात यावी.आपले अधिनिस्त असलेल्या सर्व विभागातील कर्मचारी, शिक्षक व अधिकारी यांचे मासिक वेतन व मानधन नियमित करणे संदर्भाने कार्यवाही करण्यात यावी.कास्ट्राईब कर्मचारी महासंघासोबत झालेल्या चर्चेची कार्योत्तर प्रत महासंघास अविलंब पाठविण्यात यावी.
यावेळी सर्व समस्या प्राधान्याने निकाली काढण्याचे आश्वासन गट विकास अधिकारी पंचायत समिती अर्जुनी मोरगांव यांनी दिले.
शिष्टमंडळात कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा गोंदिया चे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र खोब्रागडे, जिल्हा अति. सरचिटणीस दिनेश गेडाम, जिल्हा संघटन सचिव विकास बडोले, जिल्हा संघटन सचिव धनपाल शहारे, तालुकाध्यक्ष महासंघ देवदास मेश्राम, तालुकाध्यक्ष शिक्षक संघटना राजेश साखरे, जिल्हा संघटिका महासंघ सौ.शिला वासनिक, जिल्हा संघटक तेजराम गेडाम, जिल्हा कार्यकारिणी सदस्य युवराज वाघमारे, सी.एस.चौधरी सदस्य, पी.जी.फुलझेले सदस्य, सुभाष राजगडे सदस्य… याशिवाय लिपिक वर्ग सर्वश्री. लुटे, डोंगरावर,राऊत उपस्थित होते.