Home Breaking News *भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची:भाग्यश्री ताई आत्राम*

*भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची:भाग्यश्री ताई आत्राम*

197

*भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची:भाग्यश्री ताई आत्राम*

 

*एटापल्ली येथे तालुका स्तरीय बाल कला व क्रीडा स्पर्धेचे उदघाटन*

 

एटापल्ली: विद्यार्थ्याजन करणारे विद्यार्थी आणि त्यांना या प्रक्रियेत मदत करणारे शिक्षक यांचे बंध- अनुबंध चैतन्यपूर्ण स्वरूपाचे हवेत. शिक्षकाला मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकाराची भूमिका निभवतांना विद्यार्थ्यावर सुसंस्कार, नीतमूल्य, सकारात्मक जीवनदृष्टी यांची सुंदर नक्षी उमटवायची आहे. त्यातूनच उद्याचे आदर्श नागरिक घडणार असून देशाचे भवितव्य ठरविणार आहेत.त्यामुळे भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले.

 

एटापल्ली तालुका मुख्यालयातील जिल्हा परिषदेच्या प्रांगणात तालुकास्तरीय बाल कला व क्रीडा संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गटविकास अधिकारी आदिनाथ आंधळे,प्रमुख पाहुणे माजी पंचायत समिती सभापती बेबीताई नरोटी, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीकृष्ण पेंदाम,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार,नगर पंचायतीचे गटनेता जितेंद्र टिकले,येमलीचे सरपंच ललिता मडावी,सहाय्यक प्रशासन अधिकारी टी बी मडावी,सामाजिक कार्यकर्ते राकॉचे शहर अध्यक्ष प्रसाद राजकोंडावार, गटशिक्षणाधिकारी निखिल कुमरे, मुख्याध्यापक संदीप सुखदेवे,प्राचार्य विनय चव्हाण, मुख्याध्यापक धनंजय पोटदुखे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पुढे बोलताना प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्र तेज बुद्धी आणि वृत्ती जपणारा असतो, त्याचा कल शिक्षकाने समजावून घेतला पाहिजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील प्रकट अवगुण आणि सुप्तगुण हेरून त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आकार द्यायचा असतो. विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकांच्या मनात अनेक तक्रारी असतात. मात्र कौशल्याने त्यांच्या मुळाशी प्रयत्न करणे आवश्यक आहे.यासाठी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांच्यातील चांगल्या गुणांना प्रोत्साहन देणे, त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे, प्रकल्प राबविणे आवश्यक आहे.तेंव्हाच विध्यार्थ्यांना कुठल्याही स्पर्धेत टिकणे शक्य होणार असल्याचे मत मांडताना होणाऱ्या तालुका स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविकेत गटशिक्षणाधिकारी निखिल कुमरे यांनी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 186 शाळा असून जवळपास 725 विध्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.तीन दिवस चालणाऱ्या बाल कला व क्रीडा स्पर्धेचे उदघाटन अगदी थाटात झाले असून विध्यार्थी आणि शिक्षकांनी मान्यवरांचे जंगी स्वागत केले.तर बाल गोपालांनी झांकीद्वारे उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

Don`t copy text!