*जीवनात गुरु शिवाय मार्ग नाही:-सौ.योगीताताई पिपरे*

29

*जीवनात गुरु शिवाय मार्ग नाही:-सौ.योगीताताई पिपरे*

 

*प.पु.गुरुदेव श्री.दादाश्री बहुउद्देशीय संस्था गडचिरोली यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम*

 

*गडचिरोली:- दि.१० फेब्रुवारी*

 

*मानवी जीवनात अन्न,वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा मानल्या जातात पण त्याशिवाय एक अत्यंत महत्त्वाची गरज असते ती सद्गुरू चरणापाशी आश्रयाची! ती प्राप्त झाली की काहीही मिळवायचे राहत नाहीत. तसेच याशिवाय जीवनात खरे समाधान मिळत नाही.त्याकरिता जीवन जगताना आपल्या जीवनात गुरुशिवाय मार्ग नाही,असे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री तसेच माजी नगराध्यक्ष सौ.योगिताताई यांनी केले.*

 

*परमपूज्य गुरुदेव श्री. दादाश्री बहुउद्देशीय संस्था गडचिरोली यांच्या वतीने परमपूज्य श्री.युवानंद ब्रह्मांडी दादाश्री यांच्या आश्रमात हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.*

*याप्रसंगी परमपूज्य गुरुदेव दादाश्री,गोंडवाना सिनेट सदस्य तनुश्रीताई आत्राम, मनसे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ साळवे,श्री बोबाटे काकाजी,शिवसेना महिला आघाडी विदर्भ अध्यक्ष वर्षाताई मोरे,शिवसेना जिल्हाध्यक्ष श्रीदेवी वरगंटीवार,दीक्षाताई कोडाप तसेच भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.*